रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ATM मशीन नेली पळवून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank of maharashtra ATM mission robbery

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ATM मशीन नेली पळवून

शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गा लगत शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचेएटीएम मिशन पळवून नेले ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली याघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी मध्यरात्री च्या दरम्यान या चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शिरढोण येथील गावानजीक बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे रात्री दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा वर काळा कलर चा स्प्रे मारून आत प्रवेश करून काचेचा दरवाजा फोडून आत असणारे एटीएम कटावणी साह्याने उचकटून एटीएम बाहेर काढले.

यावेळी आवाज आल्यावर घर मालक अर्जुन निकम बाहेर आले याच वेळीत्यांच्या दिशेने गोळीबार केला चारचाकी वाहनांमध्ये घालून मळणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला येथे मधील काही तसेचघटनास्थळी पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले,पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन पाहणी केली व सूचना दिल्या.

श्वानने चोरट्यांचा मळणगाव रस्त्या लगत असलेल्या गुरुकुंज या बंगल्यापर्यंत माग काढलाशोध घेण्याचे काम सुरू आहे. अज्ञात दरोडेखोर चारचाकी वाहनानेएटीएम घेऊन पशार झाले. तर एटीएम मध्ये शुक्रवार ता.२० रोजी ३० लाख रुपये बँकेने एटीएम मध्ये अशी माहिती समोर आले आहे त्यामुळेमोठ्या प्रमाणात रक्कम असल्याची चर्चा सुरू होती.

Web Title: Bank Of Maharashtra Atm Mission Robbery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top