सांगली : बँक अधिकाऱ्यास चारचाकीतून बाहेर काढून मारहाण करत सोन्याची चेन, ब्रँडेड मोबाईल असा १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरी करून पोबारा केला. संजयनगर पोलिस ठाण्यात संजय सदाशिव खांडेकर (वय ३८, अर्जुनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल महादेव कोळी (साई मंदिरानजीक, ग्रीन पार्क, मिरज) यांनी फिर्याद दिली.