esakal | 'या' राज्यात बाहेरील या चार राज्यांना बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Banned karnatka four states outside of four state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र, गुजरात, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांतील लोकांना कर्नाटकात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रवेशबंदी 31 मे पर्यंत असणार आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

'या' राज्यात बाहेरील या चार राज्यांना बंदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र, गुजरात, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांतील लोकांना कर्नाटकात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रवेशबंदी 31 मे पर्यंत असणार आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. 

वरील चार राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. शिवाय या राज्यांमधून कर्नाटकात येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यांच्या माध्यमातून कर्नाटकात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी अमरकुमार पांडे यांनीही ट्‌विट करुन याची माहिती दिली आहे. राज्यात सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे 84 कोरोना रुग्ण आढळले. कर्नाटकात गेल्या काही दिवसांत आढळलेल्या कोरोना रुग्णांचे वरील चार राज्यांशी कनेक्‍शन आहे. 

लॉकडाउन शिथील झाल्यानंतर आंतरराज्य प्रवासाला मुभा देण्यात आली. त्यासाठी ई-पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे, परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांची संख्या वाढली. साहजिकच कोरोना रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे, या चार राज्यांतून कर्नाटकात येणाऱ्यांवर प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. परराज्यातून कर्नाटकात येण्यासाठी आधीच ई पास घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार की नाही याबाबत संभ्रम आहे.