Baramati Plane Crash Ajit Pawar Death
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Baramati Plane Crash : गांधीबाईंकडून गणित शिकलेल्या दादांनी पोरकं केलं!
Baramati Plane Crash : बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधन झाले असून महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
- आर. डी. पाटील, माजी जनरल मॅनेजर, शरयु सहकारी साखर कारखाना
Baramati Plane Crash Ajit Pawar Death : २०१९-२०२० मध्ये मी अजितदादांच्या शरयु कारखान्यात जनरल मॅनेजर होतो, त्यावेळी दादांचा सकाळी साडेसहा ते सात दरम्यान रोज सकाळी फोन यायचा. रोज रिपोर्ट पाहायचे. थोड्या वेळात रोजची स्थिती समजून घ्यायचे. कारखाना पूर्ण क्षमतेने चांगला चालला पाहिजे. यासोबत कामगारांचा पगार, त्यांची सुरक्षा याकडे बारीक लक्ष असायचे.
