बार्शी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघडकीस

सुदर्शन हांडे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बार्शी : जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून बार्शीत मोक्षधाम येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या गॅस दाहिनी उभारणी कामात भ्रष्ट्राचार व अनियमितता झाली असून काम पूर्ण होण्याआधीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पूर्ण बिल अदा केल्याचा प्रकार नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी उघडकीस आणला आहे. 

बार्शी : जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून बार्शीत मोक्षधाम येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या गॅस दाहिनी उभारणी कामात भ्रष्ट्राचार व अनियमितता झाली असून काम पूर्ण होण्याआधीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पूर्ण बिल अदा केल्याचा प्रकार नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी उघडकीस आणला आहे. 

बार्शी येथील मोक्षधाम प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने विकसीत करण्यात आले आहे. याच ठिकाणी गॅस दाहिनी व दाहिनी परिसरात मोठा हॉल बांधण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हा नियोजन मंडळास पत्र लिहिले होते. त्यानुसार गॅस दहिणीसाठी तीस लाख व इतर बांधकामास साठ लाख रुपये मंजूर झाले होते. या कामाची टेंडर प्रक्रिया घेऊन अल्फा इक्यूपमेंट याना हे काम मिळाले होते. यात गॅस दाहिनी बसवणे, कार्यान्वित करणे, नगरपालिका कर्मचारी प्रशिक्षित करणे असे कामाचे अंतिम रूप होते. 

गॅस दाहिनी बसवणे कामाची सुरुवात १४ डिसेंबर २०१७ रोजी करण्यात आली होते. तसेच ९० दिवसात हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. ८ मार्च २०१८ रोजी संमधीत कंपनीने नागरपालिकेकडे बिल जमा केले. त्याच दिवशी नगरपालिकेने भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मश टेकनोलॉगी या संस्थेशी पत्रव्यवहार केला व पाहणी करण्यास सांगितले. त्या संस्थेनेही त्याच दिवशी पाहणी करून गॅस दाहिनी कार्यान्वित असल्याचे सांगितले. तर ८ मे २०१८ रोजी सदर कंपनीने बिल मागणीचे पत्र नगरपालिकेला दिले. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तात्काळ  अल्फा इक्यूपमेंट यांना पाहिले व अंतिम बिल अदा करण्यात आले. 

या बाबत विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सोमवारी (ता.२१) प्रत्यक्ष कामावर मोक्षधाम येथे जाऊन पाहणी केली असता अद्याप गॅस दाहिनीचे काम अपूर्ण असल्याचे दिसले. अद्याप गॅस दाहिणीची चिमणी उभी केलेली नाही, गॅस युनिट जाग्यावर नाही, गॅस दाहिनीचे बरेचशे काम अपूर्ण असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी काम अपूर्ण पण बिल पूर्ण अदा केले असल्याचे निदर्शनास आणून या कामात अधिकाऱ्यांनी भ्रष्ट्राचार व अनियमितता केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराबाबत आमदार दिलीप सोपल यांनी नगरपालिका मुख्याधिकारी याना फोन करून सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली. 

बीआयटी संस्थाही संशयाच्या भोवऱ्यात...
अल्फा इक्यूपमेंट यांनी उभारलेली गॅस दाहिनी बाबत थर्डपार्टी ईनीस्पेक्शनसाठी बीआयटी या संस्थेला पत्र लिहिले होते. त्यासंस्थेने त्याच दिवशी पत्राची दाखल घेऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्याचे कळवले आहे. प्रत्यक्षात गॅस दाहिनी उभी नसताना तसे कळवल्याने बीआयटी संस्थाही नगरपालिका अधिकाऱ्यान प्रमाणे संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. 

या प्रकरणात प्रशासनातील संमधीत अधिकाऱ्यांवर अक्षम्य व फौजदारी गुन्ह्यास पात्र चुका आहेत. मढयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार ऐकलं होता पण मढ्याच्या आधीच लोणी खाण्याचा प्रकार पुढे आला आहे. 
- नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेता, बार्शी नगरपालिका, बार्शी

संंबधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून खुलासा मागवून त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात येईल. 
- शिवाजी गवळी, मुख्याधिकारी, बार्शी नगरपालिका, बार्शी
 

Web Title: BARSHI Municipal Council officials paid bill before completing work