सावधान ! यमराज आलाय गावात... मास्क नाही बांधला तर गळफास...

yamraj.jpeg
yamraj.jpeg
Updated on

कामेरी (सांगली) - ऐका... हो ...ऐका... जगायचं असेल तर घरात बसुया. नियम मोडालं तर त्याला कोरोना होणार. मास्क बांधा नाहीतर गळ्याला फास आवळेल.अशी कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृतीची गवसणी घालण्याचे काम साखराळे (ता. वाळवा) येथील विजय बाळासो जाधव गेली महिनाभर झाले करत आहेत.

त्यांचे यमराजाची वेशभूषा आणि पहाडी आवाज लोकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवितो आहे त्यांनी वाळवा शिराळा, विटा, पलूस , या तालुक्यात 90 गावामध्ये ही जनजागृतीची मोहीम राबवली आहे त्यांना त्यांचे मित्र विवेक कदम यांची साथ लाभली आहे. विजय जाधव हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यात बैलगाडीच्या शर्यती शासनाने सुरू कराव्यात व शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी सांगली ते मुंबई कोल्हापूर ते मुंबई अशी दोन वेळा पायी पदयात्रा केली होती ही पदयात्रा करताना त्यांनी बैलविना मोकळी बैलगाडी घेऊन ओडत नेली होती त्यावेळी त्यांनी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश गोळा करुन मंत्रालयापर्यंत नेल्या होत्या.

बैलगाडीच्या शर्यती सुरू व्हाव्यात व शेतकरी कर्जमाफी व्हावी म्हणून चप्पल घातलेले नाही ते अनवानी फिरत आहेत . कोरोना या पार्श्वभूमीवर लोकात जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी आता वाळवा तालुक्यात नव्हेतर इतर पाच तालुक्यात सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे यमराजाच्या वेशांतरात ते गावोगावी फिरत असून एक सहाय्यक यांनी आपल्याबरोबर घेतला आहे मोटारसायकलवरून ते प्रवास करतात मात्र कुणाच्या घरात जात नाहीत चहा पीत नाहीत किंवा कुठे थांबत नाहीत.

यमराजाचा वेश हातात तलवार, गळ्यात कवड्यांची माळ, एका हातात दोरीचा फास, असे घेऊन ते रस्त्यावर उतरतात आणि चालत चालत फिरतात फिरत असताना जर कोणी गाडीवाला किंवा एखादी व्यक्ती बिगर मास्क वाला त्यांच्या समोर आला तर ते हातातील फास त्यांच्या गळ्याला अडकवतात मास्क लावा नाही तर कोरणा होईल. ताप, खोकला सर्दी ,आला असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र संपर्क साधा.गरम पाणी प्या. घरातून बाहेर जाऊ नका सुरक्षीत रहा. असा संदेश देण्याचे काम ते करत आहेत या त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे अनेक ग्रामपंचायतींनी त्यांना आभाराचे पत्र ही बहाल केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com