भाजीपाला खरेदीसाठी झुंबड करावा लागला लाठी मार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

मिरज (सांगली) ः महापालिकेने भाजीविक्रेत्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत भाजी विक्री करण्यास सवलत दिल्याची अफवा पसरल्यामुळे येथील लोणी बाजारात शेकडो भाजी विक्रेते आणि हजारो ग्राहकांची तोबा गर्दी झाली. सकाळी अकराच्या सुमारास ही गर्दी आवाक्‍याबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच महापालिकेने पोलिस बलाचा वापर करत भाजी विक्रेत्यांना हुसकावून लावले. त्यानंतर पोलिसांनी नागरीकांना हात जोडून गर्दी कमी करण्याचे विनंती केली. तरीही पोलिसांचा आदेश धुडकावणाऱ्या काही नाठाळ उपद्रवींना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. यामुळे मिरज मार्केट परिसरात काही काळ गोधळ निर्माण झाला होता. 

आजपासून शहरी भागात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणे अथवा एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनामध्ये प्रामुख्याने गर्दी हटवण्यासह अनावश्‍यक फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून वारंवार सूचना आणि आवाहन करण्यात येत आहे. तरीही आज सकाळी महापालिकेतील काही उपद्रवी कारभाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजी विक्रेत्या परवानगी दिल्याची अफवा पसरवली. त्यामुळे परिसरातील शेकडो भाजी विक्रेते काही वेळातच लोणी बाजार परिसरात आपला बाजार मांडला. याची माहिती मिळताच नागरीकांनी गर्दी केली. मोठी झाल्याने पोलिसांना ती आवरणे कठीण झाले. 

पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, महापालिका अधिकाऱ्यांनी हात वर केले. आणि ही गर्दी हटवा, असे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पहिल्या विनंती करत हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मात्र, सौम्य लाठ मार पोलिसांना करणे भाग पडले. 

""अफवा परसवणाऱ्यांचा मुळापर्यंत जावून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिला आहे.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beat a stick for vegetable shopping