डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बाजू मांडण्यास सरपंच-सदस्यांना हवीये मुदत; सुनावणीवर आंबेडकरी समाजाचा बहिष्कार

आंबेडकरी समाजाच्यावतीने या सुनावणीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सचिन कांबळे यांनी दिली.
Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
Dr. Babasaheb Ambedkar Arch controversyesakal
Updated on
Summary

बेडग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडण्यात आली आहे.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान प्रकरणी (Dr. Babasaheb Ambedkar Arch Case) मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर कालपासून सुनावणी सुरू झाली. ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी वकिलांमार्फत बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली. तक्रारदार सुनावणीस गैरहजर राहीले.

Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
मुश्रीफांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात; महाडिकांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण ठरणार अडचणीचे?

बेडग (Bedag Miraj) येथील डॉ. आंबेडकर कमान उभारणीबाबत झालेल्या वादाबाबत विभागीय आयुक्तांकडून आलेल्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्यासमोर कालपासून सुनावणी सुरू झाली. यापूर्वी १३ डिसेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. ती सुनावणी काल (मंगळवार) झाली. ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी बाजू मांडण्यासाठी वकील दिले. मुदत देण्याची मागणी करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

आजच्या सुनावणीस दुसऱ्या गटाचे लोक आले नाहीत. आंबेडकरी समाजाच्यावतीने या सुनावणीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सचिन कांबळे यांनी दिली. गतवेळची सुनावणी विकारण, अचानक रद्द केली. शिवाय ज्यांच्या समोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्यावर आमचा विश्‍वास नाही. अन्य अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याबाबत काहीच निर्णय न घेतल्याने बहिष्कार टाकला असून मागणी मान्य झाल्याशिवाय सुनावणीस जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
rashi bhavishya horoscope in marathi of this week 18th july 2026 to 24th july 2026 all rashi
Lokrajya Magazine Printing Mistake
Marathi News Esakal
www.esakal.com