Bedana : तासगाव येथील पहिल्याच सौद्यात ४९ टन आवक: बेदाणा मार्केटमध्ये नव्या बेदाणा सौद्यास प्रारंभ; प्रतिकिलोला २५५ रुपये
Tasgaon Bedana News : पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक झाली, तर २५५ रुपये किलो इतका दर मिळाला. आमदार रोहित पाटील यांनी बेदाणा सौद्यास भेट दिली. अडत दुकानांमध्ये आज मुहुर्ताचे सौदे काढण्यात आले.
The first transaction of the season in Tásgaon sees 49 tons of dates arriving at Bedana Market, priced at Rs. 255 per kg.Sakal
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या वर्षाच्या नव्या बेदाणा सौद्यास उत्साहाने सुरवात झाली. पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक झाली, तर २५५ रुपये किलो इतका दर मिळाला. आमदार रोहित पाटील यांनी बेदाणा सौद्यास भेट दिली.