बेड उपलब्ध फक्त 25 टक्के रुग्णांसाठीच?; 75 टक्के घरी, सांगलीत आकडे मात्र वाढते...

विष्णू मोहिते
Saturday, 12 September 2020

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड मिळवणे अवघड होत आहे. त्यातही ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या तक्रारींची दिवसेंदिवस भर पडते आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना आता समूह संसर्गाच्या टप्प्यात आहे. जिल्ह्यात 20 हजारांवर बाधित झाले असून 750 हून अधिक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड मिळवणे अवघड होत आहे. त्यातही ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या तक्रारींची दिवसेंदिवस भर पडते आहे. या पार्श्‍वभूमीवर कोविड उपचार केंद्रे वाढवण्यात आली आहेत. जिल्ह्यात सद्यःस्थितीत 44 हॉस्पिटल आहेत. जिल्ह्यात 2220 बेड नोंदणीकृत असून त्यापैकी जनरल वॉर्डमध्ये 1678, तर आयसीयूचे 542 बेड आहेत. यापैकी खासगी 13 हॉस्पिटलमधील 754 बेडची सेवा सशुल्क आहे. सध्या 9 हजार रुग्ण कोरोना उपचाराखाली असून तुलनेत केवळ 25 टक्के रुग्णांसाठीच बेडची उपलब्धता आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढत असून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आता सलाईनवरच आहे. 

जिल्ह्यात 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला. पुढील साडेपाच महिन्यांत ती संख्या 20 हजारांचा आकडा पार करून गेली आहे. दररोज सातशे ते एक हजाराहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. प्राथमिक उपचार, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर अशी मागणी वाढतच आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करणे, व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे यावर बरीच चर्चा झाली. गेल्या महिनाभरात प्रत्यक्ष कामही वाढले आहे. जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी 12 हजार 394 रुग्ण आढळले होते. गेल्या 9 दिवसांत ही संख्या 20 हजारांच्या घरात पोचली आहे. नऊ दिवसांत 7 हजार 700 रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी आहे. 

या पार्श्‍वभूमीवर रुग्णांचा संपर्क विस्तार काढणे अशक्‍य झाले आहे. हा समूह संसर्गाचा टप्पा असून तो अधिक चिंता वाढवणारा ठरत आहे. आरोग्यपंढरी म्हणून मिरवणाऱ्या मिरज, सांगलीच्या मर्यादाही संपल्या आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत अन्‌ वाढणारा संसर्गही रोखता येत नाही. आता लॉकडाउन करता येत नाही आणि जनता कर्फ्यू प्रभावी होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच जाण्याचे संकेत आहेत. आणखी बेड वाढविण्याची गरज आहे. सध्या सांगली जिल्ह्यात कोठे किती बेड आहेत, या स्थितीचा हा आढावा. 

जिल्ह्यात स्थितीचा हा आढावा

 • महापालिका क्षेत्र- 1364 
 • तासगाव- 100 
 • कडेगाव- 70 
 • कवठेमहांकाळ- 45 
 • जत- 97 
 • विटा- 93 
 • आटपाडी 45 
 • पलूस -25 
 • वाळवा- 301 
 • शिराळा- 70 

महापालिका क्षेत्रातील रुग्णालयनिहाय बेडसंख्या

 • मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 298 
 • भारती हॉस्पिटल सांगली- 150 
 • आदिसागर, सांगली- 120 
 • सिनर्जी- 90 
 • घाटगे, सांगली- 70 
 • वॉनलेस मिरज- 90 
 • दुधोणकर, मल्टि - 52 
 • वॉनलेस (खासगी) - 40 
 • मेहता, सांगली- 52 
 • मिरज चेस्ट सेंटर- 48 
 • कुल्लोळी, सांगली - 43 
 • ऍपेक्‍स हॉस्पिटल - 35 
 • सिव्हिल हॉस्पिटल सांगली - 34 
 • श्‍वास हॉस्पिटल, सांगली - 30 
 • लाईफ केअर, सांगली-30 
 • क्रांती, सांगली-22 
 • भगवान महावीर, सांगली- 50 
 • डॉ. जी. एस. कुलकर्णी- 50 
 • विवेकानंद, बामणोली- कुपवाड - 60 
 • तासगाव 
 • लाईफ केअर- 39 
 • ग्रामीण हॉस्पिटल- 30 
 • कोविड रुग्णालय-31 
 • कडेगाव 
 • ग्रामीण रुग्णालय, चिंचणी- 30 
 • ग्रामीण रुग्णालय, कडेगाव- 40 
 • कवठेमहांकाळ 
 • उपजिल्हा रुग्णालय- 45 
 • जत 
 • ग्रामीण रुग्णालय- 25 
 • उमा चॅरिटेबल ट्रस्ट- 50 
 • मयुरेश हॉस्पिटल- 22 
 • विटा 
 • ओम श्री हॉस्पिटल-45 
 • श्री हॉस्पिटल-23 
 • ग्रामीण रुग्णालय-25 
 • आटपाडी-45 
 • ग्रामीण रुग्णालय-25 
 • श्री सेवा मल्टी हॉस्पिटल-20 
 • पलूस-25 
 • ग्रामीण हॉस्पिटल-25 
 • वाळवा- 301 
 • प्रकाश हॉस्पिटल, इस्लामपूर-105 
 • आधार हॉस्पिटल, इस्लामपूर-41 
 • साई मल्टिस्पेशालिटी, इस्लामपूर-38 
 • उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर-35 
 • सुश्रुषा हॉस्पिटल, इस्लामपूर- 27 
 • आष्टा, ग्रामीण रुग्णालय- 25 
 • आष्टा क्रिटिकल हॉस्पिटल-15 
 • आष्टा, स्पंदन हॉस्पिटल-15 
 • शिराळा- 70 
 • उपजिल्हा रुग्णालय- शिराळा-45 
 • ग्रामीण रुग्णालय, कोकरुड- 25 
 • संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beds available only for 25 percent of patients?; 75% are send to home