उगम ते शेवट मानगंगेचे होणार पुनर्जीवन 

From the beginning to the end, there will be a revival of Manganga river
From the beginning to the end, there will be a revival of Manganga river
Updated on

आटपाडी (जि. सांगली) : सद्‌गुरू श्री श्री साखर कारखाना, राजेवाडी आणि माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था, सांगोला यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या माणगंगा नदीच्या पुनर्जीवन कामाचा प्रारंभ खानजोडवाडी येथे आमदार अनिल बाबर यांच्या झाला. माणगंगा नदीचे उगम ते शेवटपर्यंत खोलीकरण आणि रुंदकरणाचे काम या उपक्रमात केले जाणार आहे. 


माणगंगा नदी शिखर शिंगणापूर येथील डोंगरातून उगम पावते. तेथून राजेवाडी, दिघंची, कौठुळी, नाझरे, सांगोला मार्गे वाहते. नदीचा उगम ते शेवटपर्यंत 165 किलोमीटरचा प्रवास आहे. नदीचे पात्र विस्तृत आणि खोल असून, दुष्काळी भागाचे हे वरदान मिळाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणामुळे माणगंगा नदी कोरडी पडत चालली आहे. 


सांगोला येथील माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. घोंगडे आणि स्वयंसेवकांनी नदी प्रवाहित करण्यासाठी 165 किलोमीटरचा प्रवास दोन वेळा पायी करून नदीचा अभ्यास केला. यातून माणगंगा नदी पुनर्जीवित करण्याचा अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार केला आहे. त्याच्या कामाचा आरंभ आमदार बाबर यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तानाजीराव पाटील, तहसीलदार सचिन मुळीक, सद्‌गुरू कारखान्याचे अध्यक्ष श्री. राव, श्री. घोंगडे, राजू वाघमारे उपस्थित होते. 


नदी पुनर्जीवित कामाचा 40 टक्‍के खर्च सद्‌गुरू कारखाना, तर 60 टक्‍के खर्च माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था करणार आहे.  हे काम सांगोला तालुक्‍यातून करत करत आटपाडी तालुक्‍यापर्यंत आले आहे. आटपाडी तालुक्‍यात खानजोवाडी ते राजेवाडी या 22 किलोमीटरचे काम एका महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये नदीच्या पात्राचे खोलीकरण आणि सरळीकरण केली जाणार आहे. नदीपात्रात आणि कडेला वाढलेली चिलार झाडे काढून पात्र स्वच्छ केले जाणार आहे. तसेच बावीस किलोमीटरमधील सात बंधाऱ्यांतील गाळ शेतकऱ्यांना मोफत भरून दिला जाणार आहे. 


आमदान निधीतून 5 लाख 
माणगंगा पुनर्जीवन प्रारंभ कार्यक्रमावेळी आमदार अनिल बाबर यांनी डिझेलसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून पाच लाख रुपये मंजुरीचे पत्र दिले; तसेच स्वतः 51 हजार मदतीचा धनादेश संस्थेकडे सोपवला.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com