

goat market
बेळगाव, : तालुक्याच्या गावांसह परिसरात गणेश आगमनानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी उंदरी साजरी करण्याची परंपरा आहे. घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर उंदरीच्या दिवशी बकऱ्याला मान देण्याची प्रथा अनेक गावांमध्ये आजही कायम आहे. त्यामुळे उंदरीच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. परंपरेनुसार उंदरीसाठी बकऱ्यांची खरेदी केली जात असल्याने बेळगाव तालुक्यासह परिसरातील आठवडी बाजारात बकरी बाजारांमध्ये खरेदीदारांची झुंबड उडाली.