Gokak Waterfall Flowing : गोकाक धबधब्याला मिळाली नवसंजीवनी! हिडकल जलाशयातून पाणी सोडताच पुन्हा प्रवाहित झाला धबधबा, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Gokak waterfall flowing again November 2026 : हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोकाक धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून बेळगाव आणि बागलकोटमधील २२ बंधारे भरण्यात येणार आहेत.
Hidkal dam water release latest news

Hidkal dam water release latest news

esakal

Updated on: 

-वसंत हवालदार

गोकाक (जि. बेळगाव) : घटप्रभा नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे गोकाक धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून, धबधब्याच्या परिसरातील निसर्गसौंदर्य खुलले आहे. धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories