Belagavi : सात मराठी साहित्य संमेलनांच्या तारखा जाहीर

11 पासून जागर : जानेवारीपर्यंत चालणार सोहळे
Sahitya sammelan
Sahitya sammelanSakal

बेळगाव : सीमाभागात मराठी भाषेचे जतन व विकास करण्यासाठी दरवर्षी ठिकठिकाणी मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा साहित्याचा जागर मार्चपर्यंत चालतो. गेल्या ३८ वर्षांपासून बेळगाव शहरासह १२ हून अधिक ठिकाणी संमेलने भरतात. यंदा कारदगा संमेलनाने त्याची नांदी झाली असून ११ डिसेंबरपासून जानेवारीअखेरपर्यंत सात संमेलने होणार आहेत. उर्वरित संमेलनांच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

सीमाभागात १९८६ मध्ये कडोली मराठी साहित्य संमेलनाने या जागराला सुरवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर संमेलने सुरू झाली. या संमेलनांना ३८ वर्षांचा इतिहास आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अगदी साधेपणाने संमेलने झाली होती. काही संमेलने दोन वर्षांत झालीच नाहीत. यंदा सर्वच आयोजकांनी संमेलने भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

काहींनी तारखा जाहीर केल्या आहेत. तर काहीजण लवकरच तारखा जाहीर करणार आहेत. बेळगावातील वि. गो. साठे व निलजीतील संमेलन खास मुलांसाठी भरविले जाते. तर मंथन हे महिलांसाठी भरविले जाणारे संमेलन आहे. याव्यतिरिक्त इतर संमेलनातही मराठीचा जयजयकार केला जातो.

सीमाभागात होणाऱ्या संमेलनांसाठी महाराष्‍ट्रातील साहित्यिकांना आमंत्रित केले जाते. दरवर्षी चार ते पाच सत्रांत ही संमेलने पार पडतात. प्रारंभी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी ग्रंथदिंडी, अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन, परिसंवाद तसेच मुलाखत वा मनोरंजनात्मक कार्यक्रम असे स्वरूप असते. यंदाही ही मेजवानी झोडता येणार आहे.

संमेलन तारीख

बेळगुंदी - ११ डिसेंबर २०२२

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी - १७ डिसेंबर २०२२

माचीगड - १ जानेवारी २०२३

कडोली - ८ जानेवारी २०२३

कुद्रेमानी - १५ जानेवारी २०२३

उचगाव - २२ जानेवारी २०२३

प्रगतीशील लेखक संघ - २८ व २९ जानेवारी २०२३

सांबरा, येळ्ळूर, निलजी, मंथन अद्याप तारीख निश्‍चित नाही

"‘सीमाभागात गेली दोन वर्षे संमेलने साधेपणाने झाली होती. यंदा उत्साहात होत आहेत. बेळगुंदी संमेलनाची तयारी झाली आहे. ११ डिसेंबरला संमेलन होत आहे. ही संमेलने दानशूरांच्या मदतीने भरविली जात असून महाराष्ट्र सरकारनेही आर्थिक मदत करणे गरजेचे आहे."

- भाऊराव काकतीकर, उपाध्यक्ष, बेळगुंदी साहित्य अकादमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com