बेळगाव : ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दहा वर्षाचा बालक ठार

आज सायंकाळी भात भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रोहित बसला होता.
accident
accident Sakal
Updated on

Belgaon News : ट्रॅक्टर ट्रॉलीतून खाली पडल्याने चाकाखाली सापडून दहा वर्षाचा बालक ठार (Death) झाला. शुक्रवार (ता.२४) सायंकाळी शिंदोळी क्रॉसनजिक हा अपघात घडला असून रोहित भावकाण्णा सूनगार (वय १०, निलजी) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात झाली आहे.

आज सायंकाळी भात भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रोहित बसला होता. सदर ट्रॅक्टर शिंदोळी क्रॉसनजिक आल्यानंतर चालकाने गती रोधककाजवळ ब्रेक लावला. त्यावेळी तोल जाऊन रोहित ट्रॉलीतुन खाली कोसळला. दरम्यान यावेळी त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. काहींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उत्तर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्य चिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fertilizer Shortage India
Best places to visit in Shirala during monsoon
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Warana River water discharge news
Marathi News Esakal
www.esakal.com