बेळगाव : नैऋत्य रेल्वेचे १८७.६४ किमीचे दुपदरीकरण

नैऋत्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात २०० किलोमीटरपेक्षा अधिक दुपदरीकरण व नवीन रेल्वेलाईन घालण्याचे काम पूर्ण केले आहे.
Railwayline Double Track
Railwayline Double TrackSakal
Summary

नैऋत्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात २०० किलोमीटरपेक्षा अधिक दुपदरीकरण व नवीन रेल्वेलाईन घालण्याचे काम पूर्ण केले आहे.

बेळगाव - नैऋत्य रेल्वेने (Southwest Railway) गेल्या आर्थिक वर्षात २०० किलोमीटरपेक्षा अधिक दुपदरीकरण (Double Track) व नवीन रेल्वेलाईन (Railwayline) घालण्याचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये २२ किलोमीटरची नवीन लाईन व १८७.६४ किलोमीटर दुपदरीकरण कामाचा समावेश आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यानची ही आकडेवारी असून, हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १८७.५ किमी दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. ज्यात, हुबळी-चिक्कजाज्जूर (१९० किमी) दुहेरीकरण प्रकल्पाच्या हावेरी-सौनशी (५० किमी) यासह या प्रकल्पातील १९० किमीपैकी १४५ किमी पूर्ण झाले असून, उर्वरित ४५ किमी हे आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यापूर्वी पूर्ण केले जाईल. हा विभाग हुब्बळीला बेंगळुरुशी जोडतो आणि भविष्यात दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्याची योजना आहे. होसपेट-हुबळी-लोंडा-वास्को द गामा दुहेरीकरण प्रकल्पाचा सनवोर्डेम-मडगाव (१५.६४ किमी) पूर्ण झाला आहे.

होटगी-कुडगी-गदगअंतर्गत येणाऱ्या होंबळ-होले अलूर, गदग-होंबळ काम प्रगतीपथावर आहे. तसेच निट्टूर-बनासंद्रा, अर्सिकेरे-तुमकूर (९६ किमी) दुहेरीकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. येलाहंका-पेनुकोंडा याअंतर्गत येणारा देवरापल्ली-पेनुकोंडा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

नैऋत्य रेल्वेने गदग-वाडी येथील तालकल संगनाळपासून नवीन लाईन प्रकल्प (२५७ कि.मी) २२ किलोमीटर नवीन मार्ग पूर्ण केला आहे. पुढील आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये आणखी ४५ किमी कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. नैऋत्य रेल्वेच्या प्रमुख मार्गांच्या दुपदरीकरणामुळे लाईन क्षमता वाढत आहे. यामुळे भविष्यात रेल्वेला अधिक मालवाहतूक आणि कोचिंग (प्रवासी) ट्रेन सेवा चालवता येतील. दुहेरीकरणामुळे क्रॉसिंगसाठी किंवा मर्यादित सेक्शन क्षमतेमुळे सिंगल लाईनमधील गाड्यांना होणारा खोळंबा दूर होईल.

अधिकाऱ्यांचे केले कौतुक

नैऋत्य रेल्वेचे जीएम संजीव किशोर यांनी कोरोना काळात तसेच अतिवृष्टी इत्यादी अडचणींना न जुमानता हे यश संपादन केल्याबद्दल बांधकाम विभाग आणि आरव्हीएनएलचे अभिनंदन आहे. लॉकडाउन आणि पावसाळ्यातही हे यश संपादन करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आहे. रेल्वे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या प्रयत्नात अथक योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com