बेळगाव : मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Aadhaar Card Link Voter ID Card

बेळगाव : मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक

बेळगाव : मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याच्या कार्यक्रमाला आज (ता.१) चालना मिळाली. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, डीसीपी रवींद्र गडाडीसह निवडणूक अधिकारी उपस्थित होते. मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक २०२३ पर्यंत चालणार असून, या दरम्यान शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन केले आहे.

मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक देण्याच्या कार्यक्रमाला आज चालना देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज कार्यक्रम घेऊन त्याला चालना मिळाली. मार्च अखेरपर्यंत मतदार यादी दुरुस्ती चालणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा स्वरुपाच्या मतदारांसाठी पर्यायी ११ दाखले सादर करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी आणि जबाबदारीने काम केले जावे. घरोघरी जाऊन सर्व माहिती मिळवून लिंक करण्यात यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोगाने आणलेल्या दुरुस्तीबाबत बीएलओ, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बीएलओ पर्यवेक्षकांनी चांगली मोहीम राबवावी. आधारकार्ड लिंक ३१ मार्च २०२३ पर्यंत चालणार असून, शंभर टक्के उद्दिष्ट गाठले जावे. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग याची अंमलबजावणी करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

महापालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा. आधार लिंकमुळे बनावट मतदार सहज ओळखता येतात. पारदर्शकपणे मतदार यादी आणि निवडणूक घेणे शक्य होईल, अशी माहिती दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महानिंग नंदगावी उपस्थित होते.

Web Title: Belgaum Aadhaar Card Link Voter Id Card

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top