बेळगाव : आयुर्वेदाला ‘अच्छे दिन’; उपचारांकडे वाढता कल

औषध दुकानांसह उत्पादकांच्या संख्येतही वाढ
औषध दुकानांसह उत्पादकांच्या संख्येतही वाढ
औषध दुकानांसह उत्पादकांच्या संख्येतही वाढsakal
Updated on

बेळगाव: कोरोना काळात भारतीयांना आयुर्वेदाचे महत्त्व समजले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेकजण आयुर्वेदिक औषधांकडे वळत आहेत. शहरात सध्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांची संख्याही वाढत असून अशी औषधे तयार करणाऱ्या आठ कंपन्या सध्या कार्यरत आहेत. तर तीन महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे धडे दिले जात आहेत.

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. आयुर्वेदामुळे अनेक रोगांवर उपचार करणे शक्य असल्याने या औषधांना काही वर्षांपूर्वी अधिक मागणी होती. परंतु, तत्काळ इलाज म्हणून अलीकडच्या काळात ॲलोपथी व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने आयुर्वेदिक औषधांचा वापर कमी झाला होता. परंतु, कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून आयुर्वेदिक औषधांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. सर्दी, तापापासून कर्करोगापर्यंतच्या सर्व रोगांसाठी या औषधांचा वापर वाढला आहे.

शहरात काष्ठौषदी उपलब्ध करुन देणारी चार दुकाने आहेत. मारुती गल्ली, रामदेव गल्ली व खडेबाजारमध्ये अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांची दुकाने आहेत. मात्र, अलीकडच्या काही वर्षात शहराच्या इतर भागातही अशी दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे, शहरातील आयुर्वेदीक औषध दुकानांची संख्या २५ हून अधिक झाली आहे. याठिकाणी आबालवृद्धांना उपयोगी ठरतील अशी औषधे उपलब्ध आहेत. शहरात आठ कंपन्यांकडून आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन केले जाते. तसेच विविध प्रकारचे संशोधन करुन नवनवीन औषधे बाजारात उपलब्ध करुन दिली जात आहेत. त्यामुळे, बेळगावातील औषध देशभरातून मागणी वाढत आहे.

शहरात केएलई संस्थेच्या बी. एम. कंकणवाडी महाविद्यालयासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये कार्यरत आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आयुर्वेद व उपचार पद्धतीचे धडे दिले जातात. विविध प्रकारच्या हाडांवरील उपचारांसह विविध प्रकारचे मसाज करून घेण्यासाठी या ठिकाणी रुग्णांची गर्दी असते.

‘भारतीय जीवनशैलीत आयुर्वेदाला मोठे महत्त्व आहे. कोरोना काळात जगाला आयुर्वेदाचे महत्त्व समजून आले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने अनेकजण आयुर्वेदिक औषधांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे, शहरात आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांची व कंपन्यांची संख्या वाढत आहे.’

- डॉ. श्रीनिवास पाटील, आयुर्वेदतज्ज्ञ

‘वनौषधी विक्रीत आमची चौथी पिढी कार्यरत आहे. आमच्या दुकानात काष्ठौषधीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तब्बल २३० प्रकारांची औषधे आमच्याकडे आहेत. ग्रामीण भागातील अनेक आयुर्वेदिक डॉक्टर औषधे घेऊन जात असतात. आयुर्वेदिक औषधांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.’

- प्रणव गाडगीळ, आयुर्वेदिक औषध विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com