बेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road accident

बेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठार

बेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे.

रुक्मीणी यल्लाप्पा हलकी (वय ३९), अक्षता यल्लाप्पा हलकी (वय २१, दोघीही रा. ओबल्लदीन्नी ता. सौंदत्ती), निखील अरुण कदम (वय २४, रा. कंग्राळी बुद्रुक) आणि हणमव्वा बसप्पा चिप्पलगट्टी (वय ६५, रा. बागोजीगोप्प ता. रामदुर्ग) अशी मयतांची नावे आहेत. तर पुजा यल्लाप्पा हलकी (वय २०,) मुत्तुराज यल्लाप्पा हलकी (वय ११ दोघेही रा.ओबल्लदीन्नी ता. सौंदत्ती) आणि गदगेप्पा बसाप्पा चिप्पलकट्टी (वय २२), रुपा गदगेप्पा चिप्पलकट्टी (वय २०, दोघेही रा. बागोजीगोप्प ता. रामदुर्ग) अशी जखमीची नावे आहेत. याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, आज सकाळी १२.४५ च्या दरम्यान केए २२ डी ०३७६ क्रमांकाचा ट्रक चालक रवी संगाप्पा पवाडेप्पणावर (रा. आलदकट्टी ता. सौंदत्ती) हा सिमेंट घेऊन बेळगाव बालकोट रोडवरुन भरधाव वेगाने बेळगावकडे येत होता.

निष्काळजीपणे ट्रक चालवत विरुध्द दिशेने येऊन बेळगावकडून येणाऱ्या स्वीट व्हीडीआय केए २२ डी ००३८ या मोटारीला समोरुन जोराची धडक दिली. त्यामुळे मोटार चालक निखील, व कारमध्ये बसलेल्या रुक्मीणी व त्यांची मुलगी अक्षता जागीच ठार झाल्या तर मुत्तुरार आणि पुजा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटीराने एका दुचाकीवरुन तीघेजण येणाऱ्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने हणमव्वा या जागीच ठार तर गदगेप्पा आणि रुपा हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर या मार्गावर काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यानी भेट देऊन पाहणी केली. तर मुरगोड पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघानंतर ट्रक तेथेच सोडून देऊन चालकाने पलायन केले आहे. त्यामुळे पोलिसाना ट्रक चाकल संगाप्पा पवाडेप्पणावर याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेऊन तपास चालविला आहे.

कुडची पोलीस स्थानकात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक म्हणून सेवा बजावणारे यल्लाप्पा मल्लाप्पा हलकी (वय ५१) यांची पत्नी, दोन मुली व एक मुलगा आमवस्येनिमीत्त आज भाड्याच्या मोटारीने बागलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, काळरुपा आलेल्या सिमेंटवाहू ट्रकने विरुध्द दिशेने येऊन धडक दिल्याने मोटारीतील माय लेकीसह चालक जागीच ठार झाला.