गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे 'हे' कनेक्‍शन पुन्हा चर्चेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Belgaum Connection of Gauri Lankesh murder case has once again been in discussion belgum news

बंगळूरमधील राजराजेश्‍वरीनगरातील राहत्या घरी ५ सप्टेंबर २०१८ रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रातील दोघे व कर्नाटकातील दोघा विचारवंताची एकपाठोपाठ हत्या झाल्याने देशभर खळबळ उडाली होती.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे 'हे' कनेक्‍शन पुन्हा चर्चेत...

बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला गुरुवारी (ता. ९) एटीएसने झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरासमधून जेरबंद केले. त्यामुळे, या हत्या प्रकरणाचे ‘बेळगाव कनेक्‍शन’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांनी बेळगावात बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघडकीस आले असून बेळगावातील दोघा तरुणांना यापूर्वीची अटक करण्यात आली आहे.  

मारेकऱ्यांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षणही जंगल भागात

बंगळूरमधील राजराजेश्‍वरीनगरातील राहत्या घरी ५ सप्टेंबर २०१८ रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रातील दोघे व कर्नाटकातील दोघा विचारवंताची एकपाठोपाठ हत्या झाल्याने देशभर खळबळ उडाली होती. चारी हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना साम्य आढळून आल्याने कर्नाटकातील एसआयटीने विविध अंगांनी तपास केला. त्यावेळी मास्टर माईंड अमोल काळेला अटक करण्यात आली. त्याच्याकडे आढळून आलेल्या डायरीत हत्येचे नियोजन, त्यासाठी वापरलेल्या व्यक्‍ती, त्यांना दिलेली टोपणनावे, कोडवर्ड आदीवरुन विविध माहिती बाहेर पडली. हत्या करण्यासाठी वापरलेली बंदूक उद्यमबागमध्ये तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच मारेकऱ्यांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षणही बेळगाव तालुक्‍यातील किणयेनजिकच्या चोरखिंड आणि खानापूर तालुक्‍यातील चिगुळे जंगलभागात देण्यात आले होते.

वाचा - भरकटलेल्या `त्या` मुलींना महिलेने पोहोचविले असे घरी

 पोलीस पथके बेळगावात ठाण मांडून होती

महाव्दार रोड, बेळगावमधील भरत कुरणे याचे चिखलेत फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी ते वास्तव्यास होते. तर शहापूरमधील प्रवीण चतुरला लंकेश यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी वापरलेली दुचाकी चालविल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्याला मसालेवाले या नावाने ओळखले जात होते. गौरी लंकेश यांची हत्या आणि बेळगाव कनेक्‍शन सिध्द झाल्याने तपास यंत्रणाने आपले लक्ष प्रामुख्याने बेळगावर केंद्रीत केले होते. तपासासाठी पोलीस पथके यापूर्वी अनेकदा बेळगावात ठाण 
मांडून होती.