Black Fungus : शस्त्रक्रियेसाठी रात्रभर रुग्णांना उपाशी ठेवलं; अन्...

ब्लॅक फंगसवरील गोळ्याही उपलब्ध नसल्याने रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात येत नसल्याचा प्रकारसमोर आलाय.
Representative Image
Representative Image

बेळगाव: जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाण्याअभावी ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांवरील शस्त्रक्रियाच रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. गुरुवारी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांना बुधवारी सायंकाळपासून उपाशी ठेवण्यात आले होते. मात्र, सकाळी अचानक त्यांच्यावरील शस्त्रक्रिया रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्याचबरोबर ब्लॅक फंगसवरील गोळ्याही उपलब्ध नसल्याने रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात येत नसल्याने या प्रकाराचा निषेध करत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसह ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या चार रुग्णांवर आज शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यामुळे त्यांना कालपासून अन न घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, आज सकाळी अचानक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आले असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. याचे कारण विचारले असता जिल्हा रुग्णालयातील पाणीपुरवठा ठप्प झाला असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर ब्लॅक फंगस बाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या गोळ्या देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

Representative Image
व्यसनमुक्तसाठी आला अन् दारूसाठी वीज टॉवरवर चढला

संबंधित रुग्णांना दररोज तीन गोळ्या देणे जरुरीचे आहे. पण गोळ्यांचा साठा नसल्याचे कारण सांगत रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आज जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी भागोजी पाटील यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

Representative Image
ठरलं! महापालिका निवडणूक होणार; विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

जिल्हा रुग्णालयात पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे रुग्णावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. रुग्णालयात सर्व प्रकारची इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लवकरच ही समस्या दूर करण्यात येईल, अशी माहिती डॉ. आर. जी. विवेकी (संचालक बिम्स) यांनी दिलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com