बेळगाव : जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बेळगाव : जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

बेळगाव: दोन आठवड्यात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही. एकीकडे देशात व राज्यातही कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढल्याची भिती व्यक्त होत असताना जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे.२२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात एक कोरोनाबाधित सापडला होता. त्यानंतर ७ मे पर्यंत एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही. पण जिल्ह्यत अद्याप ७ सक्रीय कोरोनाबाधित आहेत. हे ७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेल्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त होईल. पण सक्रीय कोरोनाबाधितांची ही संख्या दोन आठवड्यांपासून तेवढीच आहे. त्यामुळे दोन आठवड्यात ते बरे होवून घरी कसे गेले नाहीत? असा प्रश्‍न आहे. याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाकडून दिलेले नाही. त्यामुळे सक्रीय कोरोनाबाधितांच्या संख्येवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

तीन एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित सापडला. याच दिवशी तिघे कोरोनाबाधित सापडले. तेव्हापासून आजवर जिल्ह्यातील १ लाख १४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ९९ हजार १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन वर्षात जिल्ह्यात कोरोनामुळे १ हजार २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची पहिली लाट एप्रिल २०२० मध्ये आली.

पण पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग जुलै २०२० मध्ये वाढला. त्याचवेळी कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले. दुसरी लाट मे २०२१ मध्ये आली. त्यावेळी ही लाट केवळ एक महिनाच राहिली. पण या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त मृत्यू झाले. तिसरी लाट डिसेंबर २०२१ च्या अखेरीस सुरू झाली तर जानेवारी २०२२ मध्ये संसर्ग वाढला. या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढली, पण मृत्यूचे प्रमाण कमी होते. फेब्रुवारी महिन्यापासून तिसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली. मार्च व एप्रिल महिन्यात तर कोरोनाचा संसर्ग एकदम कमी झाला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कोरोनाची लाट संपुष्टातच आली. मे महिन्यात तर एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात मास्क सक्ती केली आहे.

नागरीक निर्धास्त

गेल्या दोन आठवड्यात एकही कोरोनाबाधित न सापडल्यामुळे नागरीक निर्धास्त झाले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटेत बेळगाव शहरात सर्वाधिक संसर्ग होता, पण तीन आठवड्यात एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही.

Web Title: Belgaum District Moving Towards Coronation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top