Belgaum district drinking water shortage news
esakal
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती योजना तयार केली आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर, पाणीगळती रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर आदींचा समावेश (Belgaum drought water crisis latest update) आहे. तसेच, महाराष्ट्राकडे कृष्णा नदीत दरमहा अर्धा ते एक टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.