असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. तसेच अनेक कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व करून लढे दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले गेले होते.
बेळगाव : सीमालढ्यातील अग्रणी, पहिले सीमा सत्याग्रही, ज्येष्ठ कामगार नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे सोमवारी निधन (Krishna Menase Passes Away) झाले. त्यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली असून, आयुष्याच्या अखेरपर्यंत साम्यवादी पक्षाबरोबर ते कायम राहिले.