
बेळगाव : आरोग्य विभागाची ‘हर घर दस्तक’
बेळगाव : जिल्ह्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम हाती घेण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. ‘हर घर दस्तक’ असे नाव अभियानाला देण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागात मोहिमेंतर्गत लसीकरण चालेल. दरम्यान, १२ ते ४४ या वयोगटात सुमारे ८१ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी १२ ते १८ वयोगटात सुमारे तीन लाख लसीकरण झाले.
शहरात आणि गावपातळीवर पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या १८ पेक्षा कमी वयोगटातील मुलांना घरी भेट देऊन लसीकरण करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यावर याची जबाबदारी असेल. वेळोवेळी याचा आढावा घेतला जाईल. पुरेशा स्वरुपात लस उपलब्ध आहे. यामुळे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही करण्यात येणार आहे. याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. तर आशा कार्यकर्ते व अंगणवाडी सेविकांचे सहाय्य घेण्यात येईल. जिल्ह्यात कोविडचे प्रमाण घटले असून, त्याला कारणीभूत यशस्वी लसीकरण मोहिम आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे उद्दिष्ठ शंभर टक्के यशस्वी झाले आहे.
बूस्टर डोसही बऱ्यापैकी जणांनी घेतली आहे. मात्र, १२ ते १८ वयोगटातील लसीकरण खूप कमी आहे. पालक व मुलांतील भीती त्याला कारणीभूत आहे. शिवाय मार्च आणि एप्रिल महिन्यांत परीक्षा होत्या. यानंतर उन्हाळी सुटी लागली. यामुळे लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे प्रतिनिधी प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करतील. दरम्यान, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात अधिकृत आदेश बजाविण्यात येण्याची शक्यता आहे.
१२ ते १८ वयोगटासाठी करणार घरोघरी जाऊन लसीकरण ८१ लाख जणांचे लसीकरण जिल्ह्यात एकूण ८१,४१,३४८ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यापैकी ४० लाख २८ हजार ८९८ जणांनी पहिला डोस व ३९ लाख ६३ हजार ६६३ जणांनी दुसरा डोस घेतला; तर १,४८,७८७ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
Web Title: Belgaum Health Department Knocks Every Door
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..