
बेळगाव : गुजराती भाषिकांचा सर्वच क्षेत्रांत ठसा
बेळगाव: मूळचे गुजरातचे व व्यवसायानिमित्त बेळगावला स्थायिक झालेल्या गुजराती भाषिकांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध व्यवसायांत त्यांनी आपली छाप उमटविली असून, गुजराती भवनाच्या माध्यमातून अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. बेळगावातGujarati speakersबोलणाऱ्यात पाटेदार समाज व गुजराती समाजाचा समावेश करता येईल.
गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र विभागातील तसेच आनंद या जिल्ह्यातील सुमारे ६० ते ८० वर्षांपासून गुजराती भाषिकांनी बेळगावाला येऊन वास्तव्य केले. यामध्ये सध्या उद्योजक, चहा व्यापारी, मसाला व्यापारी, हार्डवेअर व कपडे व्यावसायिकांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम आखले जातात. यावेळी दांडिया, गरबा, आरतीही होते. तसेच या भाषिकांकडून संक्रांती, दसरा-दिवाळीही साजरे होतात.
या भाषिकांकडून जात, धर्म, भाषा न मानता सढळहस्ते गरजूंना मदत केली जाते. अतिवृष्टी, महापूर, कोरोना काळात आर्थिक तसेच अन्नधान्याचे किट देऊन सहकार्य करण्यात आले. गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्ये होतात. शास्त्रीनगरात गुजरात भवन आहे; सण व उत्सवात विविध कार्यक्रम, तसेच संघाच्या बैठका या ठिकाणी होतात. या भाषिकांत पटेल, जडेजा, लद्दड, शाह, राणा आदी अाडनावाचे भाषिक आहेत.
सध्या गुजराती समाजाचे अध्यक्ष म्हणून रमेश लद्दड कार्यरत आहेत. तसेच, उपाध्यक्ष बीपीनभाई पटेल, खजिनदार रजनिकांत पटेल, सचिव पंकज शहा, वीरेंद्रसिंग जाडेजा, लखमसिंग लद्दड, धरमसिंग भानुशाली, राजेंद्र पटेल, धनंजय पटेल, भूपेंद्र पटेल आदींकडून समाजाला मार्गदर्शन केले जाते.मार्केट, रविवार पेठ आदी भागात यांनी व्यवसाय थाटला आहे. तसेच शास्त्रीनगर, हिंदवाडी, टिळकवाडी, मराठा कॉलनी या भागात या भाषिकांचे अधिक वास्तव्य आहे. बेळगावात वास्तव्यास असलेल्या बहुतांशी गुजराती भाषिकांकडून गुजराती, मराठी, इंग्रजी, कन्नड, हिंदी या पाच भाषा अगदी आरामात बोलल्या जातात.
Web Title: Belgaum Impressions Gujarati Speakers Fields
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..