बेळगाव : रोजगार हमी योजनेतही महिलांचा वाढता सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार हमी

बेळगाव : रोजगार हमी योजनेतही महिलांचा वाढता सहभाग

बेळगाव : रोजगार हमी योजना महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतील महिलांचा सहभाग ४६.०५ टक्के आहे.‌ एकूण १२,०८,३६९ महिला रोहयोत काम करत आहेत. शेतीकामाला जाणाऱ्या महिला रोहयोला प्राधान्य देत आहेत. रोजगार हमी योजनेत पुरुष आणि महिलांना समान वेतन दिले जाते. ग्रामीण भागातील कुटुंबे यापूर्वी केवळ शेतीच्या हंगामात गावात राहत असत. हंगाम संपताच कामाच्या शोधार्थ शहराकडे निघून जात. मात्र, रोहयोमुळे हे स्थलांतर थांबले आहे. प्रारंभीच्या काळात महिला रोहयोच्या कामाला जात नसत. तर पुरुष गावातील गटार बांधकाम, खोदकाम आणि इतर कामे यातून होत असल्याने या कामाला नकार देत होते; पण रोहयोतील कामाचे स्वरुपही बदलण्यात आल्याने कामांची मागणी वाढली आहे. सध्या रायबाग तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १,३४,९६७ महिला कामगार आहेत. तर सर्वात कमी २१,८७२ कागवाड तालुक्यात आहेत. बेळगाव तालुक्यात १,१७,३२१ तर खानापुरात ८४,७३५ कामगार आहेत.

मागील चार वर्षांत रोहयो मजुरीत वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. २०१९ साली २४९ रुपये मजुरी होती.‌ आता ही मजुरी वाढून ३०९ रुपये झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी ही सुसंधी ठरली आहे.

रोहयोत काम करणाऱ्या महिला गावातील स्त्री संघटनांच्या बचत गटातही सक्रिय आहेत. त्यामुळे, यातून मिळणाऱ्या मजुरीचा विविध कामासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही वापर आहे.‌ त्यामुळे ग्रामीण भागात महिलांकडून कामासाठीची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी महिला देखील शेती हंगाम संपल्यानंतरच्या काळात रोहयोच्या कामात सक्रियहोत आहेत.‌

रोहयोत काम करणाऱ्या महिलांची संख्या

 • तालुका महिलांची संख्या

 • बेळगाव १,१७,३२१

 • अथणी १,१०,२८८

 • बैलहोंगल ७५,१५१

 • चिक्कोडी ७५,४४७

 • गोकाक १,०६,९९५

 • हुक्केरी १,२२,३२७

 • कागवाड २१,८७२

 • खानापूर ८४,७३५

 • कित्तूर २९,७१५

 • मुडलगी ५६,८६०

 • निपाणी ४३,०९९

 • रामदुर्ग १,२५,५४९

 • रायबाग १,३४,९६७

 • सौंदत्ती ९९,५४३

एकूण १२,०८,३६९

Web Title: Belgaum Increasing Participation Women Employment Guarantee Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top