
बेळगाव : म्हैसूर विद्यापीठाने प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचा निकाल तीन महिन्यानंतरही लावला नाही. यामुळे विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी दिसून येत आहे. विद्यापीठाने तातडीने निकाल लावला अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.
राज्यात म्हैसूर विद्यापीठाकडून के-सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. विविध विषयातून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेले लाखभर विद्यार्थी दरवर्षा के-सेट साठी अर्ज करतात. यंदा राज्यातील ११ जिल्ह्यातील विविध केंद्रावरही परीक्षा झाली होती. यासाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान के-सेट साठी अर्ज निघाले होते. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना व त्यानंतर परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आल्यामुळे के-सेट परीक्षा सुमारे तीन वेळा पुढे ढकलली होती. यामुळे देखील विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत होती. अखेर २५ जुलै रोजी विविध केंद्रावर के-सेट ची परीक्षा झाली. या परीक्षेला तीन महिने झाले आहेत. तरी देखील अध्याप निकाल लागलेला नाही. यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.
के-सेट साठी राज्यभरातून सुमारे ८४ हजार विद्यार्थी बसले होते. २५ जुलै रोजी ओएमआर शिटच्या माध्यमातून ही परीक्षा पार पडली. ओएमआर शिट असल्यामुळे निकालही लवकर लागु शकतो. मात्र, म्हैसूर विद्यापीठाने तीन महिन्यांचा कालावधी का घेतला? असा प्रश्न विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे. यासंबंधी के-सेट दिलेले विद्यार्थी राणी चन्नमा विद्यापीठाशी संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. निकाल लागला नसल्याने पुढील के-सेट साठी अर्ज कधी निघणार असा प्रश्नही विद्यार्थ्यांना पडला आहे. के-सेट उत्तीर्ण झाल्यानंतर आपण राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पात्र होतो. मात्र, या परीक्षेचा निकाल अध्यापही लागला नसल्याने अनेक जण यापासून दूरच आहेत. यामुळे म्हैसूर विद्यापीठाने याचा तातडीने निकाल लावाला अशी मागणी होत आहे.
वेबसाईटवर ‘की अन्सर’ उपलब्ध म्हैसूर विद्यापीठाने आपले वेबसाईटवर सर्व विषयांची ‘की अन्सर’ उपलब्ध करून दिली आहे. यामुळे विद्यार्थी आपण पास की नापास याचा तपास करत आहेत. मात्र, निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.