बेळगाव : पिस्तुलचा धाक दाखवत कोल्हापूरच्या सुवर्णकाराची ५ कोटींची रोकड पळवली

पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत कोल्हापूर येथील सुवर्णकाराच्या मालकीची ४ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली आहे.
pistol
pistolSakal
Summary

पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत कोल्हापूर येथील सुवर्णकाराच्या मालकीची ४ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली आहे.

बेळगाव - मालवाहू बोलेरो वाहनाचा मोटारीतून थरारक पाठलाग करून पिस्तुल (Pistol) आणि चाकूचा (Knief) धाक दाखवत कोल्हापूर येथील सुवर्णकाराच्या मालकीची ४ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांची रोकड (Money) पळविण्यात (Theft) आली आहे. शुक्रवार (ता.८) गद्दीकोरवीकोप्प एम के. हुबळी रोडवर हा दरोडा (Robbery) पडला असून या प्रकरणी रविवार (ता.१०) बैलहोंगल पोलीस ठाण्यात पाच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी सुवर्णकार विकास विलास कदम (वय ३८, रा. आटपाटी, जि. सांगली रा. महाराष्ट्र) यांनी बैलहोंगल पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरू केला आहे. फिर्यादी कदम यांचे कोल्हापूर येथे लक्ष्मी गोल्ड नामक सुवर्णपेढी आहे. दुकानात झालेल्या व्यवहाराचे ४ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांची रोडक त्यांच्याकडे होती. त्यापैकी २७ लाख ३० हजार रुपयांची रोडक एका बॉक्स मध्ये घेतली तर उर्वरित ४ कोटी ७० लाख रुपये पाच पोत्यामध्ये भरली. त्यांनतर ही रक्कम फिर्यादीच्या दुकानात काम करणारे सचिन भानुदास ऐहोळे (रा. वडेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि महादेव रामचंद्र बनसोडे (रा. शेनेवादी, ता. माण, जि. सातारा रा. महाराष्ट्र) यांच्या ताब्यात देण्यात आली. दोघांनी सदर रक्कम फिर्यादीच्या मालकीच्या केए २२ डी २३३३ या मालवाहू बोलेरो वाहनाच्या बॉडीमध्ये ठेवली. त्यानंतर ते शुक्रवार (ता. ८) रोजी कोल्हापूरहून उडपीला जाण्यासाठी पुणे बंगळूर रोडवरून बेळगाव मार्गे हिरेबागेवाडीला आले.

हिरेबागेवाडीतून महामार्ग सोडून बैलहोंगल रोडवरून पुढे जात असताना हिरेबागेवाडी येथील हल्ली मने ढाबा नजिक केए २८ पी. ६४३२ क्रमांकाच्या वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी कार बोलेरोच्या आडवी आणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी प्रसंगावधान दाखवत बोलेरो चालक सचिनने वाहन पुढे रेटले. बैलहोंगल रोडवरून पुढे येऊन गद्दीकरवीकोप्प एम. के. हुबळी रोडवरून एम. के. हुबळी पासून एर्टीगा कारने बोलेरोचा पुन्हा पाठलाग सुरू केला. ओव्हरटेक करत एर्टीगा बोलरोच्या आडवी उभी करून त्यातील दोघेजण हातात पिस्तुल आणि चाकू घेऊन खाली उतरले. त्यांनी सचिन आणि महादेवला हाताने मारहाण करत आपल्या कारगाडीत कोंबले. त्यानंतर दोन्ही वाहने तेथून वळवून घेऊन गद्दीकोरवीकोप्प गावाच्या पुढे येऊन वाहने थांबविली. त्यांनतर बोलेरो वाहनातील ४ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन हिसकावून घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले. घटनेची माहिती समजताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक यु. एच. सातेहल्ली पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com