esakal | तवंदी घाटातील अपघातामुळे बेळगाव-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत | Nipani
sakal

बोलून बातमी शोधा

nipani

तवंदी घाटातील अपघातामुळे बेळगाव-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत

sakal_logo
By
- राजेंद्र हजारे

निपाणी: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटातील दुसऱ्यावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरला अपघात झाला. ही घटना गुरुवारी (ता. ७) रात्री घडली. अपघात घडताच चालक वाहन सोडून पसार झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच चालक आणि वाहकाचे प्राण बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, बंगळूर येथून मुंबईला जाणारा कंटेनर घाटातील धोकादायक दुसऱ्या वळणावर आला. यावेळी वेगात असलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनरचा पुढील भाग दुभाजकावर आदळल्याने चक्काचूर झाला. शिवाय तोंड विरुद्ध दिशेला जाऊन वाहन थांबले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता वाहनाच्या चालकाने वाहन सोडून पळ काढल्याचे दिसून आले. या अपघातामुळे बेळगावहून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर महामार्ग वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही वाहतूक सुरळीत केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.

loading image
go to top