मिरज येथील समीर शेख याचा दोन दिवसांपूर्वी रायबागमध्ये खून झाला. यापूर्वी गोकाक, सौंदत्ती आणि बेळगावात खुनाच्या घटना घडल्या आहेत.
Belgaum Murder Case : बेळगाव जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या ९ महिन्यांत ७३ जणांचा खून झाला आहे. तर लैंगिक अत्याचाराबाबतचे गुन्हे, कौटुंबिक कलह व हुंडाबळीसारख्या गुन्ह्यांच्या नोंदी वाढल्या आहेत. गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरलेल्या बेळगावमध्ये गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे. सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) पोलिसांना मोठे आव्हान झाले आहे. बेळगाव शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना होऊन वाढलेले गुन्हे चिंता वाढविणारे आहे. जिल्ह्यातील विविध वाढते गुन्हे आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आजपासून प्रकाश...