बेळगाव - रोहयोतील बनावटगिरीला आता बसणार आळा

ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा
rojgar hami yojana
rojgar hami yojanasakal

बेळगाव : रोजगार हमी योजनेत मजुरांचा ऐवजी यंत्रांच्या सहाय्याने काम करणे यापुढे शक्य नाही. केंद्र सरकारने ही बनवेगिरी थांबविण्यासाठी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर (एनएमएमएस) हे नवे तंत्रज्ञान विकसित केले असून बेळगाव जिल्ह्यात त्याचा वापर सुरू झाला आहे.

rojgar hami yojana
नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'जबाबदारीने वागणं माझ्याकडून...'

रोहयोत काही ग्रामपंचायती मजुरांनी काम केल्याचे दाखवून त्यांच्याऐवजी यंत्राच्या सहाय्याने काम करीत बनावट बिले तयार करून केंद्र सरकारचा निधी हडप करीत आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशानेच रोहयोचे काम चालते. पण या उद्देशालाच बगल देण्यात आली आहे. मजुरांना काम मिळत नसल्याने वेळोवेळी कामाची देखील मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकार थांबविण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

rojgar hami yojana
पोलिस अधीक्षकांचा संवादाला प्रतिसाद...तक्रारींसाठी मोबाईलचा आधार

तंत्रज्ञान असे काम करेल

  • रोहयोत एकाच ठिकाणी २० हून अधिक कामगार हवेत.

  • काम होत असलेल्या ठिकाणीच कामगारांचे फोटो आणि हजेरी अपलोड होतील.

  • मजुराची जॉब कार्ड संख्या, कामाचे ठिकाण आणि कामाचे नाव यावर नोंद होईल.

  • रोज सकाळी ११ वाजण्यापूर्वी आणि दुपारी २ ते ५ या वेळेत दोन वेळा हे तंत्रज्ञान कामगारांचे फोटो हजेरी म्हणून घेईल.

  • एनएमएमएस तंत्रज्ञानात काम करताना कामगाराचा फोटो नसल्यास मजुरी मंजूर होणार नाही.

  • एनएमएमएस तंत्रज्ञान अंतर्गतच कामगारांची हजेरी घेतली जाईल.

-विनायक जाधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com