
Belgaum : स्मार्ट कामांना हवी गतीची जोड
बेळगाव : तब्बल सहा वर्षे उलटूनही बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेतील कामे अद्याप शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. २५ जून २०१६ रोजी स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या चार कामांचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले होते. पुढील पाच वर्षात म्हणजे २५ जून २०२१ पर्यंत स्मार्ट सिटी योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणे आवश्यक असतानाही ती झालेले नाही. आता सहा वर्षे पूर्ण होवूनही अनेक महत्वाची कामे व योजना सुरुच झालेल्या नाहीत.
१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा केंद्रीय नगरविकास विभागाने केला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरात बेळगावातील स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत तरी बेळगावातील कामे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. या योजनेतील पहिल्या स्मार्ट रोडचे म्हणजे मंडोळी रोडचेच काम न्यायालयीन स्थगितीमुळे गेल्या चार वर्षांपासून थांबले आहे. संबधित ठेकेदाराने स्मार्ट सिटी विभागावर दावा ठोकला आहे. व्हॅक्सिन डेपोतील कामे न्यायालयीन स्थगितीमुळे गेले वर्षभर थांबली होती. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे काही कामांना ब्रेक लागणार आहे.
जानेवारी २०१६ मध्ये बेळगाव शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली, पण योजनेतील कामांची सुरुवात जून २०१६ मध्ये झाली. सप्टेंबर २०१६ मध्ये या योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील ४०० कोटी रुपये निधी मिळाला, पण २५ जून २०१६ रोजी शुभारंभ झालेल्या कामांसह योजनेतील अन्य सर्वच कामे रखडली. या योजनेचे व्यवस्थापकीय संचालकही सातत्याने बदलण्यात आले. त्यामुळेही योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आले. गेल्या सुमारे वर्षभरापासून प्रवीण बागेवाडी हे व्यवस्थापकीय संचालक असून सध्या कामे वेगाने सुरु झाली आहेत.
पूर्ण झालेली महत्त्वाची कामे
स्मार्ट बसथांबे (तीन टप्पे), शहापूरमधील रवींद्र कौशिक ई-लायब्ररी, वडगावमधील १० खाटांचे रुग्णालय, स्मार्ट बस स्टॅंड, खाऊ कट्टा, वॉटर किऑस्क, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, ट्रॉमा सेंटर, स्मार्ट क्लास रुम (दोन टप्पे), शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले डिस्प्ले बोर्ड्स, कमांड व कंट्रोल सेंटर, ट्रॉफीक सिग्नल्स, ई-रिक्षा वितरण, कणबर्गी तलाव सुधारणा, ६५ सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन्स, सराफ कॉलनी व नाथ पै उद्यानात थीम पार्क निर्मिती, पटवर्धन ले-आऊटमध्ये उद्यान निर्मिती, शांतीनगर येथे उद्यान निर्मिती, शहरातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा.
प्रगतिपथावरील महत्त्वाची कामे
महात्मा फुले उद्यान सुधारणा, स्मार्ट क्लास रुम्स चौथा टप्पा, स्मार्ट शाळांमध्ये पायाभूत सुविधा, उद्यमबाग-टिळकवाडी-शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही बसविणे, अंगणवाडी सुधारणा भाग अ व भाग ब, रुक्मिणीनगर येथे स्मार्ट झोपडपट्टी, उत्तर ग्रामीण मतदारसंघात पाच ठिकाणी उद्यान निर्मिती, आर्ट गॅलरी, एव्हीएशन गॅलरी, ग्रामीण जीवन, हेरीटेज पार्क, व्हेंडींग झोन.सुरू न झालेले प्रकल्प शहरात ३५ हजार एलईडी दिवे बसविणे, बायसिकल शेअरिंग
Web Title: Belgaum Smart Works Need Speed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..