Belgaum st bus Division not refund for students money
Belgaum st bus Division not refund for students money

सहलही चुकली; पैसेही मिळेनात ; विद्यार्थ्यांनी जायचे कोठे? 

बेळगाव - यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचा आनंद लुटता आला नाही. पण, सहलीसाठी जमा केलेले पैसेही त्यांना अद्याप परत मिळालेले नाहीत. परिवहन मंडळाचा कारभार त्याला कारणीभूत ठरला आहे. सहलीचे पैसे विद्यार्थ्यांना परत करण्यासाठी शिक्षकांना परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. मात्र, बेळगाव विभागाकडून तांत्रिक कारणे सांगितली जात असून हुबळीतील मुख्य कार्यालयातून पैसे घेण्याची सूचना केली जात आहे. 

दरवर्षी दसऱ्याची सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक सहलींना सुरवात होते. शिक्षण खात्याच्या नियमानुसार शैक्षणिक सहलींसाठी राज्य परिवहन मंडळाची बस आरक्षित करणे आवश्‍यक आहे. खासगी वाहनांचे अपघात वाढल्याने शिक्षण खात्याने हा नियम लागू केला आहे. प्रशिक्षित चालक आणि वीमा संरक्षणामुळे परिवहनची बसच सहलीसाठी ठरवावी लागते. त्यामुळे, शहर परिसरातील अनेक शाळांनी यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शैक्षणिक सहल काढण्यासाठी परिवहनकडे बसेस आरक्षित केल्या होत्या. मात्र, डिसेंबरमध्ये नागरीकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलन पेटल्यानंतर राज्यातही काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शिक्षण खात्याने सर्व सहली रद्द करण्याची सूचना शाळांना केली होती. त्यानुसार शाळांनीही परिवहन मंडळाला कळवून डिसेंबरमधीलल सहलीचा बेत रद्द केला. 

आता या सर्व प्रकारानंतर बस आरक्षित करण्यासाठी भरलेली आगाऊ रक्कम परिवहनकडेच अडकून पडली आहे. अनेक शाळांनी आगाऊ रकमेपोटी संपूर्ण रक्कम भरली आहे. सहल रद्द झाल्यानंतर काही शिक्षकांनी परिवहनच्या बेळगाव विभागीय कार्यालयात जाऊन आरक्षणासाठी भरलेली आगाऊ रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र, विभागीय कार्यालयाने रक्कम परत करण्याचा अधिकार आपल्याकडे नसून हुबळीतील मुख्य कार्यालयातूनच मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, बुकींग बेळगावात आणि कॅन्सलेशन हुबळीत असा अनुभव शिक्षकांना आला आहे. रक्‍कम हवी असल्यास हुबळीतील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. हुबळीत जाऊन रक्‍कम परत मिळविणेही शिक्षकांना खर्चिक ठरणार आहे. बुकींग बेळगावात केले असल्याने कॅन्सलेशनही व्हावे. अन्‌ बेळगाव कार्यालयातून रक्‍कम परत मिळावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. पण, महिना उलटला तरी रक्कम परत मिळालेली नाही. 

आपण हुबळीतच परिवहनच्या कार्यक्रमात आहे. अधिकाऱ्यांकडून सहल पैसे परताव्याबाबतची माहिती घेऊ. नेमके काय झाले आहे, ते पाहावे लागेल. काही अडचणी असल्यास त्या स्थानिक पातळीवरच दूर केल्या जातील. 
- एम. आर. मुंजी, विभागीय नियंत्रक, परिवहन बेळगाव विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com