बेळगाव : खानापूर तालुका समितीत एकी

मारुती परमेकर यांची घोषणा हब्बनहट्टीतील बैठकीत शिक्कामोर्तब
खानापूर
खानापूर sakal

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांत बिनशर्त एकी झाली असल्याची घोषणा माजी तालुका पंचायत सभापती मारुती परमेकर यांनी केली. एकीसाठी हब्बनहट्टी येथील मारुती देवस्थानात गुरुवारी (ता. २४) रोजी दोन्ही गटांतील सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विचार मंथनानंतर त्यांनी ही घोषणा केली.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत दोन गट निर्माण झाले होते. परिणामी, चळवलीला याचा मोठा फटका बसल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी होती. चळवळीला मरगळ आल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विखुरले गेले. दोन्ही गटांत एकी व्हावी, अशी इच्छा वारंवार जनतेतून उपस्थित होत होती. मात्र, या ना त्या कारणाने एकीच्या प्रक्रियेत खंड पडला होता.

मागील महिन्यात दोन्ही गटांतील सदस्यांनी एकीसाठी गाठीभेटी घेतल्या. देवाप्पा गुरव यांच्या गटातील गोपाळ देसाई, निरंजन सरदेसाई, राजू पाटील या सदस्यांनी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटाने नेमलेल्या आबासाहेब दळवी, शिवाजी पाटील आणि डी. एम. भोसले यांच्या त्रिसदस्यीय समितीला २४ रोजी बैठक घेण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने आज हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत दोन्ही गटांतील सदस्यांनी विचार मांडले. तब्बल पाच तासांच्या विचार विनिमयातून आजच एकीवर शिक्कामोर्तब व्हावे, यावर सर्वजण ठाम राहिले. ज्येष्ठ सदस्यांनी चर्चा करून एकीचा निर्णय घेतला.

यावेळी माजी आ. दिगंबर पाटील, देवाप्पा गुरव, गोपाळ देसाई, यशवंत बिरजे, गोपाळ पाटील, विवेक गिरी, पांडुरंग सावंत, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, लक्ष्मण कसरलेकर, सूर्याजी पाटील, माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, नारायण कापोलकर, धनंजय पाटील, किरण पाटील, मुरलीधर पाटील, माजी जि. प. सदस्य जयराम देसाई, विनायक सावंत, रणजित पाटील, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार आदींसह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

‘कार्यकारिणी’साठी ४ एप्रिलला बैठक

आता येत्या ४ एप्रिल रोजी शिवस्मारकातील सभागृहात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली असून, त्यामध्ये कार्यकारिणीची पुनर्रचनेवर चर्चा होणार असल्याची माहिती परमेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com