जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त एक हजार 579 कोरोना रुग्णांना...जिल्ह्यातील केवळ 10 रुग्णालयांत लाभ 

बलराज पवार
Friday, 28 August 2020

सांगली-  कोरोना रुग्णांची अव्वाच्या सव्वा बिले येत असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचारांचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या सुमारे दहा हजारांवर पोचली असताना त्यापैकी किमान 50 टक्के रुग्णांनी रुग्णालयांत उपचार घेतले असावेत, असा अंदाज आहे. त्यापैकी आजवर अवघ्या एक हजार 579 रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार झाले आहेत. जिल्ह्यात 30 पैकी 10 कोविड रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळतोय. त्यातही योजनेचा लाभ मिळणाऱ्या जागांची संख्या नगण्य आहे. त्यामुळेही या योजनेचा लाभ मिळत नाही. 

काल (ता. 26) उच्चांकी 444 इतकी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नोंदली गेली. एकीकडे वाढते रुग्ण आणि उपचारांचा खर्च अफाट यात रुग्णांच्या कुटुंबीयांची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. मिरजेच्या शासकीय कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते, तोवर उपचार खर्चाचा विषय फारसा चर्चेत आला नाही. मात्र, खासगी रुग्णालयांत उपचार सुरू झाले आणि खर्चाचा विषय स्फोटक बनला. राज्य सरकारची घोषणा एक आणि वस्तुस्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट होत आहे. फुले योजनेंतर्गत बेडची संख्या आणि रुग्णसंख्या यातली तफावत मोठी आहे. 

प्रशासनाने 19 रुग्णालये कोविड उपचारांसाठी अधिग्रहीत केली. मात्र, त्यात 10 रुग्णालयांतच योजनेचा लाभ मिळतो. तिथेही बेड कमी आहेत. शिवाय, रुग्णाला लाभासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना पुरेवाट होत आहे. रुग्णाचे नातेवाईक क्वारंटाईन असतील तर कागदपत्रे पूर्तता कोण करणार, अशा अनेक कारणांमुळे रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यावर प्रशासनाने उपाय शोधले पाहिजेत. 

काय हवे? 
0 योजनेत समावेश असलेल्या आणखी रुग्णालयांची गरज 
0 खासगी रुग्णालयांना सरसकट योजनेचा लाभ द्यावा 
0 विमा कंपनीशी चर्चा करून या योजनेच्या विस्ताराची गरज 
0 योजनाबाह्य खर्चाबाबतही गरीब रुग्णांना आर्थिक मदतीची गरज 
0 विमा योजनेतील अनेक जाचक अटी वगळून योजना सुलभ करावी 
0 इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशनवर डॉक्‍टरांना उपचाराची मुभा हवी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefit of Janaarogya Yojana to only one thousand 579 Corona patients. Benefit in only 10 hospitals in the district