World Photography Day : फोटोग्राफीतून स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग 

best photographs of solapur smart city by Chetan Ligade
best photographs of solapur smart city by Chetan Ligade

सोलापूर : आपलं सोलापूर स्मार्ट सिटी होताना अनेक सकारात्मक बदल होत आहे. सोलापूरच्या सकारात्मक गोष्टी छायाचित्रांतून सर्वांसमोर आल्याच पाहिजे यासाठी हौशी छायाचित्रकार चेतन लिगाडे प्रयत्नशील आहेत. स्मार्ट सोलापूर सिटीसोबतच आपली सिद्धेश्‍वर यात्रा, संस्कृती, सण-उत्सव यांची छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. 

चेतन लिगाडे हे प्रिसिजन कंपनीत डिझाइनर पदावर नोकरी करतात. फोटोग्राफर्स डे निमित्त "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, "नोकरी, संसाराच्या रोजच्या धावपळीत माणूस स्वत:च्या आवडी-निवडी विसरून गेला आहे. प्रत्येकालाच छोट्या-छोट्या गोष्टींचे टेंशन आहे. या टेंशनपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम आहे. विद्यार्थीदशेपासून माझा फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला. फोटो सर्वजण काढतातच पण आपली क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवते.' 

माझ्याकडे असलेल्या कॅमेराद्वारे सोलापुरातील सण-उत्सवाचे फोटो मी काढतो. इतरांची फोटोग्राफी पाहून मी शिकत असतो. सण, उत्सवात मी काढलेले फोटो सोशल मीडियाच्या माध्यामतून हजारो लोकांपर्यंत पोचतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाइक मिळतात. माझे फोटो लोकांना आवडतात. कॉमेंटच्या माध्यमातून मला शबासकी मिळते. हा सगळा प्रवासच माझ्या फोटोग्राफीसाठी मला प्रोत्साहान देत असतो, असे चेतन लिगाडे यांनी सांगितले. 
-- 
एखाद्या चांगल्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करण्याची मला आवड आहे. मी नेहमी वेळगे, रचनात्मक फोटो काढण्यासाठी प्रयत्नशील असतो. घराबाहेर पडलो की आज काहीतरी वेगळा फोटो काढायचा हेच माझ्या डोक्‍यात असतं. पोटा-पाण्यासाठी नोकरी असली तरी आनंदी आयुष्य जगण्यासाठी मी फोटोग्राफीची आवड जोपासली आहे. 
- चेतन लिगाडे, छायाचित्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com