भाई माधवराव बागल पुरस्कार प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

एक नजर

  • भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर.
  • ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार. 
  • मंगळवारी (ता. २८) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाचला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

मंगळवारी (ता. २८) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाचला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. अशोकराव साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, रवी जाधव, संभाजी जगदाळे, शंकर काटाळे आदी उपस्थित होते.

शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. आनंद मेणसे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांतही सातत्याने लिखाण केले आहे. यापूर्वी संतराम पाटील, गणपतराव वडणगेकर, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, यशवंत चव्हाण, नागनाथआण्णा नायकवडी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, निळू फुले, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, पद्मश्री लक्ष्मण माने, व्यंकाप्पा भोसले, शमशुद्दीन मुश्रीफ, पुष्पा भावे, डॉ. भारत पाटणकर आदींना या पुरस्काराने गौरविले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhai Madhavrao Bagal award to Prof Anand Mense