esakal | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा...जलसंपदा मंत्री जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

sathe.jpg
सांगली,     लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने त्यांना " भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणीसह पाठपुरावा करु, असेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा...जलसंपदा मंत्री जयंत पाटील

sakal_logo
By
विष्णू मोहिते


सांगली,  ः     लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने त्यांना " भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणीसह पाठपुरावा करु, असेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आदरांजली वाहून जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले," लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्राच्या स्वातंत्र निर्मितीसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत समाज जागृतीच्या रुपाने योगदान दिले आहे. अशा या प्रतिभावंत नेत्याला "भारतरत्न' देवून सन्मानित करावे. श्री. साठे यांची जयंती आणि जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त ही मागणी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी आणि केंद्र सरकारकडे शिफारसीसाठी आग्रह असेल. 

दरम्यान, जगात व देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या चाहत्यांनी सामाजिक अंतर राखून लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली वाहिली. लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती साजरी झाली. श्री. साठे मराठीतील महत्वाचे साहित्यिक आहेत. कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी, गावगाढा आणि स्वातंत्र्य चळवळ याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अणाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलिकडे पोहचवली. सर्व प्रकारच्या कर्मठ आणि कट्टरपणाला विरोध करून न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणूक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. त्यांना आज आदरांजली वाहिली. 
................