सांगोल्यात गणपतराव देशमुखांचा वारसदार ठरला; यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर ठरला. शेतकरी कामगार पक्षाकडून सांगोला विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा आमदार देशमुख व शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून अकरावेळा आमदार राहिलेले आहेत. 

सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर आज (ऱविवार) ठरला. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना सर्वानुमते उमदेवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे माझ्याकडे पाच नावे आली आहेत मी व शेकापचे सर्व पदाधिकारी यावर निर्णय लवकरच घेणार आहोत. या निवडणुकीत मी उमेदवार नसलो तरी जो उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने आजपासून कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर ठरला. शेतकरी कामगार पक्षाकडून सांगोला विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा आमदार देशमुख व शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून अकरावेळा आमदार राहिलेले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhausahaeb Rupnar is succesor of Ganpatrao Deshmukh in Sangola