esakal | पासिंग नसल्याने भवानीनगरची कचरा गाडी वादात 

बोलून बातमी शोधा

Bhavani Nagar's garbage truck in dispute due to lack of passing

सहा लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या कचरा गाडीचे शासनाने घालून दिलेला मुदतीमध्ये पासिंग केले नाही. पासिंगची मुदत संपल्यानंतर केंद्र शासनाने BS4 मॉडेलच्या गाडीस कायमस्वरूपी बंदी घातल्याने भविष्यात पासिंग होण्याची कोणतीच शक्‍यता नाही.

पासिंग नसल्याने भवानीनगरची कचरा गाडी वादात 
sakal_logo
By
शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : सहा लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या कचरा गाडीचे शासनाने घालून दिलेला मुदतीमध्ये पासिंग केले नाही. पासिंगची मुदत संपल्यानंतर केंद्र शासनाने BS4 मॉडेलच्या गाडीस कायमस्वरूपी बंदी घातल्याने भविष्यात पासिंग होण्याची कोणतीच शक्‍यता नाही. त्यामुळे भवानीनगर (ता. वाळवा) गावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कचरा गाडी खरेदी करून गावास नाहक आर्थिक भुर्दंड घातला आहे. 

घडल्या प्रकाराची वाळवा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच धनाजी रसाळ यांनी केली आहे. कचरा गाडीचे कधीच पासिंग होणार नसल्याने ती आता भंगारात जाणार आहे. आरटीओ पासिंग नसताना या गाडीचा बेकायदा वापर सुरू असून इंधन, नोकर पगाराचा खर्च ग्रामपंचायतीच्या नांवे खर्ची पडत आहे. पासिंग नसल्याने विमा संरक्षण नाही. अशा परिस्थितीत भविष्यात कोणताही अपघात होऊन जीवित अगर इतर काणतेही नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रसाळ यांनी उपस्थित केला आहे. 

ऑनलाईन कचरा गाड़ी खरेदी केल्याने गावाची साठ हजार रुपयांची बचत झाली आहे. वेळेत कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्याने आरटीओ पासिंग करणे शक्‍य झाले नाही. शासकीय आदेश येताच पासिंग करून घेतले जाईल. 
- राजेश कांबळे, सरपंच, ग्रामपंचायत भवानीनगर 


संपादन : प्रफुल्ल सुतार