पंढरपूर : भीमा नदीचा पूर 10 फुटाने कमी

धीरज साळुंखे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

भीमा नदीला आलेल्या महापुर ओसरू लागल्याने नदीकाठच्या पूरग्रस्त निराधार लोकांना आधार मिळाला आहे. पुराचे पाणी 10 फुटांनी कमी झाल्याने पटवर्धन कुरोलीसह नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

भाळवणी (ता. पंढरपूर) : भीमा नदीला आलेल्या महापुर ओसरू लागल्याने नदीकाठच्या पूरग्रस्त निराधार लोकांना आधार मिळाला आहे. पुराचे पाणी 10 फुटांनी कमी झाल्याने पटवर्धन कुरोलीसह नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

दगम्यान, पटवर्धन कुरोली येथील बंधारा उघडा झाला आहे. त्या वरती काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात अडकली आहेत. या बंधाऱ्यावर प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवणे आवश्यक असून, या ठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालून बंधार्यावरुन फिरताना दिसतात.

नदीपात्रात वाहत आलेल्या काटेरी झुडपामुळे काही अंशी नदीपात्रात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन त्या पाण्याचा फुगवटा निर्माण होत असल्याने पाणी बाजूला वाढत असल्याचेही सांगितले. नदीकाठच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मोठ्या धाडसाने हे लोक सामोरे जात आहेत.

पटवर्धन कुरोली बंधाऱ्याचे पाणा दीड फूट कमी झाले आहे. या ठिकाणी मोबाईल मध्ये सेल्फी घेण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima River floods downstream in pandharpur