भोजापूर धरण ओव्हरफ्लो...लाभक्षेत्रास दिलासा ; ३५० क्युसेसने विसर्ग 

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे (नगर) : सिन्नर तालुक्याचा पूर्व भाग व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसराला वरदान ठरलेले भोजापूर धरण गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. धरण भरल्याने म्हाळुंगी नदीत ३५० क्युसेसने ओव्हरफ्लो सुरु झाला आहे.

भोजापूर धरणाच्या पश्चिम पट्ट्यात गट सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने ३६१ द. ल. घ. फुट क्षमतेचे भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले. गतवर्षी भोजापूर धरण २५ जुलैला भरले होते. त्यामुळे लाभक्षेत्रात तीन महिने पूरपाणी सुरू होते. यंदा मात्र भोजापूर धरण उशिराने भरले. या धरणाचे पाणी सिन्नर तालुक्याच्या वाट्याला ६५ टक्के तर संगमनेर तालुक्याच्या वाट्याला ३५ आहे. धरण भरल्यावर ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे, अशी मागणी केली जाते. मात्र ओव्हरफ्लोचे पाणी प्राधान्याने म्हाळुंगी नदीत सोडले जाते. त्यानंतर चाऱ्यांना पाणी सोडले जाते. भोजापूर धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

भोजापूर धरण उशिराने ओव्हरफ्लो झाल्याने यंदाही संगमनेर तालुक्यातील दुष्काळपिडीत तळेगाव भागाला पूरपाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. यंदा पिंपळे पाझर तलाव तरी भरेल का ? असा प्रश्न आहे.
 
Web Title: Bhojapur dam overflow ; 350 Cusec