
-विजय पाटील
पुनवत : शिराळा तालुक्यातील कोकण पट्ट्यातील डोंगर तसेच तालुक्यातील डोंगररांगा, डोंगरकपारीत आणि इतर पडीक मोकळ्या रानातील रानमेवा म्हणून ओळखली जाणारी व औषध उपयोगी असणारी व प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या पूजेला महत्त्व असलेली बिब्ब्याची झाडे पोषक वातावरणामुळे चालूवर्षी चांगलीच बहरली आहेत.