
बेळगाव : शाळा सुरु होण्यास विलंब झाल्याने यावर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना यावेळी सायकल वितरणापासुन वंचीत रहावे लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी शाळा सुरु झाल्यानंतर आठवीमधील विद्यार्थ्यांची माहिती घेऊन सायकलींचे वितरण केले जाते. मात्र यावर्षी सायकल वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली शिक्षण खात्याने सुरु केलेल्या नाहीत.
कोरोनामुळे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला असुन शाळा कधीपासुन सुरु होतील. याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. दरवर्षी शाळा सुरु होताच गणवेष, पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. काही महिन्यांनी सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकली वितरीत केल्या जातात. शाळा बंद असल्या तरी शिक्षण खात्यातर्फे विभागावार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच गणवेश वितरणासाठी निविदा मागविण्यात आली आहे. त्यामुळे गणवेश वितरण होण्याची शक्यता आहे. मात्र सायकलींचे वितरण करण्याबाबत निविदा मागविण्यात आलेली नाही.
कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर अधिक भर पडला असल्याचे सांगत सरकारने विविध योजनांना अनुदान मंजुर करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अनेक सरकारी योजना रखडल्या आहेत. परिणामी सायकल वितरणासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची गरज असल्याने अद्याप सायकलींसाठी निविदा काढण्यात आलेली नाही असे दिसुन येत आहे. राज्यातील अनेक भागात अजुनही परीवहन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अजनुही चालत शाळेत यावे लागते. त्यामुळे शिक्षण खात्याकडुन दिल्या जाणाऱ्या सायकलींमुळे विद्यार्थ्यांना येजा करण्यास मदत होते.
योजना लागु करण्यात आल्यापासुन बेळगाव शैक्षणिक जिल्हासह राज्यातील 3 लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण होणार की नाही हे शाळा सुरु झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. परंतु शाळा विलबांने सुरु झाल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करुन सायकलींचे वितरण करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.
हेही वाचा - पाच वर्षे तलाठीच नाही ; कामाला लागलाय ब्रेक -
"सायकल वितरणाबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. शाळा सुरु झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्यावर भर दिला आहे."
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.