कायदेशीर प्रक्रियेनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडली; बेडग ग्रामपंचायतीचा मोठा दावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची संयुक्त कमान उभारण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन होते.
Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
Dr. Babasaheb Ambedkar Arch controversyesakal
Updated on: 
Summary

ग्रामपंचायतीने कोणतेही बेकायदा कृत्य केलेले नाही. कमान पाडल्याप्रकरणी तक्रार करणारे बाहेरील लोक आहेत, बेडगचे रहिवासी किंवा मतदार नाहीत.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील स्वागत कमान पाडण्याची कारवाई पूर्णत: कायदेशीर प्रक्रियेनेच राबवण्यात आल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषदेत झालेल्या सुनावणीवेळी बेडगचे (Bedag Gram Panchayat) सरपंच उमेश पाटील, संभाजी नागरगोजे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी बाजू मांडली.

Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
Sangli News : डॉ. आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडणारी बेडग ग्रामपंचायत बरखास्त करा; बौद्ध समाज आक्रमक

बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशाने जिल्हा परिषदेत काल सुनावणी झाली. सुनावणीसाठी प्रशासनाने सरपंच, उपसरपंचांसह सदस्य, गटविकास अधिकारी व ग्रामसेवक अशा सतरा जणांना नोटीस बजावली होती.

Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
लोकसभेसाठी सातारा-माढा मतदारसंघातील उमेदवार कोण, जागा कोणाला? शिवेंद्रराजेंनी चेहऱ्यावर हास्य आणत सांगितला 'उमेदवार'

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासमोर सत्ताधारी गटाने आज बाजू मांडली. सुमारे साडेतीन तास सुनावणी चालली. यामध्ये फक्त सत्ताधाऱ्यांनीच बाजू मांडली. सुनावणीदरम्यान, सत्ताधारी गटाच्या वकिलांनी सांगितले की, अर्जदारांनी कमानीसाठी परवानगी मागताना दबावतंत्राचा वापर केला. कमान बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती पाडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.

त्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवून गटविकास अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात कमान पाडण्याची सूचना केली. त्यानुसारच कार्यवाही केली. ग्रामपंचायतीने कोणतेही बेकायदा कृत्य केलेले नाही. कमान पाडल्याप्रकरणी तक्रार करणारे बाहेरील लोक आहेत, बेडगचे रहिवासी किंवा मतदार नाहीत. तक्रार अर्जावरील बहुतांश स्वाक्षरी बोगस आहे. कमानीमुळे रहदारीला अडथळा होत असल्याचे निष्पन्न झाल्यानेच ती वरिष्ठांच्या परवानगीने पाडली.

Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy
Hasan Mushrif : 'मी आणि संजय घाटगेंनी सर्व निवडणुकांत एकत्र काम करण्याची शपथ घेतलीये, आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये'

त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची संयुक्त कमान उभारण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन होते. मात्र आंबेडकरी समाजाने त्याला सहमती दर्शविली नाही. या सुनावणीवेळी विरोधी सदस्य, तत्कालीन गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी आणि ग्रामसेवक यांना आज म्हणणे मांडता आले नाही. २९ किंवा ३० जानेवारी रोजी ती होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kausadi Gram Panchayat
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Babasaheb Patil RBI action news
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Marathi News Esakal
www.esakal.com