सहकार मंत्र्यांचे सेवा सोसायट्यांबाबत मोठे वक्तव्य, इतकी रक्कम देऊ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मंत्री पाटील म्हणाले, की आदर्श पतसंस्थेने 25 वर्षांत सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केले. ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. त्यामुळे संस्थेची प्रगती झाली. स्वमालकीची इमारत उभी राहिली. सहकार चळवळीत चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील.

राहुरी : राहुरी फॅक्‍टरी येथे आदर्श नागरी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सेवा सोसायट्यांबाबत मोठे वक्तव्य केले.

माजी खासदार तनपुरे अध्यक्षस्थानी

अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसाद तनपुरे होते. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चोथे, उपाध्यक्ष सुधाकर कदम, सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, सत्यजित कदम, गणेश भांड, विजय सेठी, प्रकाश संसारे, घनश्‍याम शेलार, श्‍यामराव निमसे, सबाजी गायकवाड उपस्थित होते. 
 

इतकी रक्कम देणार

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती केली. या रकमेचा जमाखर्च करून, शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक करणाऱ्या सेवा सोसायट्यांना हाताळणी खर्चापोटी दोन टक्के रक्कम दिली जाईल. त्यामुळे सोसायट्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. सोसायट्यांच्या सचिवांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

सरकार खंबीरपणे उभे राहील

मंत्री पाटील म्हणाले, की आदर्श पतसंस्थेने 25 वर्षांत सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केले. ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. त्यामुळे संस्थेची प्रगती झाली. स्वमालकीची इमारत उभी राहिली. सहकार चळवळीत चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. सोसायट्यांना कर्जमाफी रक्कम हाताळणी खर्च दोन टक्के दिला जाईल, अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली. प्रकाश सोनी यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big statement on the service societies of Co-operative Ministers