विजापूरला होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ 

राजू पुजारी ः
Monday, 27 July 2020

संख ः विजापूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील 95 कोटींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.2022 पर्यंत कालमर्यादा देण्यात आली आहे. 220 कोटी रुपये मंजूर केले आहे.विजापूर पासून 50 किलोमीटरवर असलेल्या जत तालुक्‍यातील विकासाला गती मिळणार आहे.विविध फायदे होणार आहेत. 

संख ः विजापूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील 95 कोटींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.2022 पर्यंत कालमर्यादा देण्यात आली आहे. 220 कोटी रुपये मंजूर केले आहे.विजापूर पासून 50 किलोमीटरवर असलेल्या जत तालुक्‍यातील विकासाला गती मिळणार आहे.विविध फायदे होणार आहेत. 

भारताच्या इतिहासात विजापूर (विजयपूर) शहराला ऐतिहासिक शहर म्हणून महत्व आहे.येथील गोलघुमट जगप्रसिद्ध आहे. 
विजापूर शहरापासुन सन 2009 साली 15 कि.मी अंतरावर मदभावी आणि बुरानपुर या गावाच्या हद्दीतील 727 एकर जमिन हस्तांतरण करण्यात आले आहे. विजापुर एअरपोर्टमुळे दुबई,मुंबई ,पुणे,दिल्ली ,बेंगलुरू,हैद्राबाद ,तिरूपती,चैन्नई या देशा-परदेशातुन सरळविमान सेवा मिळणार आहे. 
जत ते विजापुर केवळ 50 कि, मी व पूर्व भागातील गावे तर 20-25

कि.मी.एवढ्या कमी अंतरावर असल्याने या विमानतळामुळे जत तालुका हा हवाईमार्गाने जगाशी जोडला जाणार आहे.विजापुर विमान सेवेचा तालुक्‍याला होणारे फायदे होणार आहे.सध्या 300 कि.मी अंतरावरील पुणे येथील विमानतळावर जाण्याची आवश्‍यकता भासणार नाही.

जत ते मुंबई,बंगलुरू, हैद्राबाद,तिरूपती आणि चैन्नई येथे दोन तासात तर जत ते दिल्ली व कलकत्तासारख्या ठिकाणी तीन तासात पोहचणे शक्‍य होणार आहे.कवठेमंहकाळ, तासगाव तालुक्‍यातील संरक्षण दलात असणाऱ्या सैनिकांची तसेच येथिल लोकप्रतिनिधीचीही मुंबई आणि दिल्ली येथे येण्या-जाण्यास जतहून केवळ 2 ते 3 तास लागणार असल्याने त्यांची प्रवासाची अति उत्तम सोय विजापूर विमानतळामुळे होणार आहे. 
--------------- 
यांना होणार फायदा 
विटा, जत पंश्‍चिम भागातील सोने- चांदी दुकानदार व्यावसायिकाची पंश्‍चिम बंगाल, कोईमतूर, तामिळनाडू,हैद्राबाद येथे संख्या मोठी आहे. त्यांना प्रवास करणे सुलभ होणार आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तालुक्‍यातील गुड्डापुर येथे येणाऱ्या कर्नाटकातील भाविकांची बेंगलोरहून विजापुर ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने येथे भाविक तर वाढणार आहेत 

संपादन ः अमोल गुरव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bijapur will have an international airport