Sangli Accident : सांगलीतील झुलेलाल चौकात अपघात दुचाकीस्वार ठार; ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल

Sangli News : मारुती वाघमारे हे दुचाकीवरून झुलेलाल चौकातील सिंधी पुरुषार्थी हॉलसमोरून घराकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या विरुद्ध बाजूने ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेत वाघमारे यांचा मृत्यू झाला.
Accident scene at Jhulelal Chowk in Sangli where a motorcyclist lost his life in a tragic collision with a tractor.
Accident scene at Jhulelal Chowk in Sangli where a motorcyclist lost his life in a tragic collision with a tractor.Sakal
Updated on

सांगली : येथील झुलेलाल चौकातील सिंधी पुरुषार्थी हॉलसमोर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. मारुती शामराव वाघमारे (रा. शामरावनगर, सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत विठ्ठल शामराव वाघमारे यांनी पोलिसांत फिर्याद असून, ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com