
आटपाडी (सांगली) ः गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांचे घर मोडून पडले. त्या वयोवृद्ध दाम्पंत्याने मदतीसाठी प्रशासनासह अनेकांचे उंबरठे झिजविले. पण पदरी निराशाच पडली. मात्र आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या उपेक्षितांच्या मदतीसाठी बाबासाहेबांचे दोन अनुयायी धावून आले. त्यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकराची जयंती साजरी केली.
आटपाडी - दिघंची रस्त्यावर माणगंगा कारखान्याजवळ शंकर व कमल ढोबळे हे वृध्द दांम्पत्य मुलासह झोपडीत राहते. मोलमजुरीवर त्यांची उपजिविका असते. त्यांना शासकीय योजनेतून घरकुल मिळाले होते. पण त्याचे काम पूर्ण होत असतानाच 17 मार्चला वादळातच घरावरचे पत्रे उडून गेले. बांधकामाला भेगा पडल्या. सारी झोपडीच उडून गेली. त्यानंतर मदतीसाठी त्यांनी अनेकांचे उंबरठे झिजवले. सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांचीही त्यांनी भेट घेतली. श्री. खाटीक यांनी आपल्या परीने शासन दरबारी प्रयत्न केले मात्र पदरी निराशाच आली. कालच्या वादळी वारा , वीजांचा कडकडाट आणि पावसाच्या वातावरणाने भेदरलेल्या संतोषने पुन्हा खाटीक यांच्याशी संपर्क साधला. श्री खाटीक यांनी ऍड सुभाष सातपुते आणी पी. एम. वाघमारे यांना आज विनंती केली. आज बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत या या दोघांनी तत्काळ चौकशी करीत 25 हजार रुपये व विविध संसारपयोगी वस्तू मदत म्हणून दिल्या. बाबासाहेबांचा विचार खऱ्याअर्थाने त्यांनी पुढे नेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.